Penny Stocks | अजून काय आहे हवे दोन-चार रुपयांत, हे Penny शेअर करतील श्रीमंत

Penny Stocks | शेअर बाजारात दिग्गज कंपन्यांचे शेअर खरेदी करण्यासाठी जादा दाम मोजावे लागतात. पण पेनी शेअर तुम्हाला अगदी गोळ्या, बिस्कीट, चॉकलेटच्या किंमतीत मिळतील. या पेनी शेअरमध्ये गुंतवणुकीतून तुम्हाला कमाई करता येईल. या 10 पेनी शेअरमध्ये सोमवारी अप्पर सर्किट लागले होते.

Penny Stocks | अजून काय आहे हवे दोन-चार रुपयांत, हे Penny शेअर करतील श्रीमंत
Follow us
| Updated on: Feb 06, 2024 | 10:09 AM

नवी दिल्ली | 6 February 2024 : सोमवारी शेअर बाजाराला कमाल दाखवता आली नाही. बजेट समजायला जणू शेअर बाजाराला उशीर लागला आणि त्याचे गणितही काही बाजाराच्या पचनी पडलेले नाही. सोमवारी बाजाराची रडत पडत सुरुवात झाली. बीएसई निर्देशांक 354 अंकांच्या कमजोरीसह 71731 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीत निफ्टी 82 अंकांची घसरणीसह 21771 अंकवर बंद झाला. सोमवारी शेअर बाजारात या काही शेअर्समध्ये पडझड दिसली. युपीएलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण आली तर बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी लाईफचा शेअर कमाल दाखवू शकला नाही.

पेनी शेअरची कमाल

काही पेनी शेअरने बाजारात कमाल दाखवली. या शेअरमध्ये सोमवारी अप्पर सर्किट लागल्याचे दिसून आले. हे शेअर गोळ्या, बिस्कीट, चॉकलेटच्या दरात खरेदी करता येतात. त्यासाठी मोठी किंमत पण मोजावी लागत नाही. पण पेनी शेअरमधील गुंतवणूक धोक्याची मानण्यात येते. त्यामुळे स्टॉक खरेदी करताना या गोष्टीची खूणगाठ नक्की बांधून ठेवा.

हे सुद्धा वाचा

या पेनी शेअरवर ठेवा लक्ष

  1. GTL Infrastructure Limited च्या शेअरचा भाव 2.14 रुपयांवर पोहचला आणि यामध्ये 4.9 टक्क्यांचे सर्किट लागले होते.
  2. TV Vision Ltd च्या शेअरची किंमत 5.4 रुपयांवर पोहचली. या शेअरमध्ये सोमवारी 4.85 टक्के अप्पर सर्किट लागले होते.
  3. Kanani Industries Ltd चा शेअर 6.73 रुपयांवर पोहचला. यामध्ये 4.99 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले.
  4. Garment Mantra Lifestyle Ltd शेअरची किंमती 8.87 रुपयांवर पोहचला. 9.91 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते.
  5. Sharika Enterprises Ltd च्या शेअरचा भाव 11.22 रुपयांवर पोहचला. यामध्ये 4.96 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते.
  6. Nila Infrastructures Ltd च्या शेअरची किंमत 12.1 रुपये झाली. यामध्ये 4.94 टक्क्यांचे सर्किट लागले.
  7. Zeal Aqua Ltd च्या शेअरचा भाव 14.29 रुपयांवर पोहचला आणि यामध्ये 5 टक्के सर्किट लागले होते.
  8. Jaiprakash Power Ventures Limited शेअरची किंमत 19.95 रुपयांवर पोहचली. यामध्ये 5 टक्के अप्पर सर्किट लागले होते.
  9. PVP Ventures Limited च्या शेअरचा भाव 23.33 रुपयांवर पोहचला. या शेअरमध्ये 5 टक्क्यांचे अप्पर सर्किट लागले होते.
  10. Sadbhav Engineering Ltd च्या शेअरचा भाव 25.55 रुपयांवर पोहचला आणि यामध्ये 4.97 टक्क्यांचे सर्किट लागले होते.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.