नवी दिल्ली | 6 February 2024 : सोमवारी शेअर बाजाराला कमाल दाखवता आली नाही. बजेट समजायला जणू शेअर बाजाराला उशीर लागला आणि त्याचे गणितही काही बाजाराच्या पचनी पडलेले नाही. सोमवारी बाजाराची रडत पडत सुरुवात झाली. बीएसई निर्देशांक 354 अंकांच्या कमजोरीसह 71731 पातळीवर बंद झाला. तर निफ्टीत निफ्टी 82 अंकांची घसरणीसह 21771 अंकवर बंद झाला. सोमवारी शेअर बाजारात या काही शेअर्समध्ये पडझड दिसली. युपीएलच्या शेअरमध्ये 12 टक्क्यांची घसरण आली तर बजाज फायनान्स, भारती एअरटेल आणि एचडीएफसी लाईफचा शेअर कमाल दाखवू शकला नाही.
पेनी शेअरची कमाल
काही पेनी शेअरने बाजारात कमाल दाखवली. या शेअरमध्ये सोमवारी अप्पर सर्किट लागल्याचे दिसून आले. हे शेअर गोळ्या, बिस्कीट, चॉकलेटच्या दरात खरेदी करता येतात. त्यासाठी मोठी किंमत पण मोजावी लागत नाही. पण पेनी शेअरमधील गुंतवणूक धोक्याची मानण्यात येते. त्यामुळे स्टॉक खरेदी करताना या गोष्टीची खूणगाठ नक्की बांधून ठेवा.
या पेनी शेअरवर ठेवा लक्ष
सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल. पेनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना जागरुक राहा. कंपनीचे फंडामेंटल तपासा. भूलथापांना अजिबात बळी पडू नका.