Pepperfry : फर्निचर विक्रीतून उभी केली कोट्यवधींची कंपनी, पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे निधन

Pepperfry : पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे हृदयविकाराने लेहमध्ये निधन झाले. दोन दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. हा व्हिडिओ शेवटचा ठरला. शेवटच्या व्हिडिओत म्हणाले, देवाचा माझ्यासाठी काही वेगळाच..

Pepperfry : फर्निचर विक्रीतून उभी केली कोट्यवधींची कंपनी, पेपरफ्रायचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे निधन
Follow us
| Updated on: Aug 08, 2023 | 6:14 PM

नवी दिल्ली | 08ऑगस्ट 2023 : ऑनलाईन फर्निचर कंपनी पेपरफ्रायचे (Pepperfry) सहसंस्थापक आणि CEO अंबरीश मूर्ति (Ambrish Murthy) यांचे 51 व्या वर्षी निधन झाले. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यावेळी ते लेहमध्ये होते. अंबरीश यांनी 2011 मध्ये आशिष शाह यांच्यासह मुंबईत फर्निचर आणि होम डेकोर कंपनीची स्थापना केली होती. ते IIM कोलकत्त्याचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांना ट्रेकिंगची आवड होती. पेपरफ्राय सुरु करण्यापूर्वी ते ईबेमध्ये कंट्री मॅनेजर पदावर होते. दोन दिवसांपूर्वी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. हा व्हिडिओ शेवटचा ठरला. शेवटच्या व्हिडिओत म्हणाले, देवाचा माझ्यासाठी काही वेगळाच..

आशिष शाह यांनी दिली माहिती

पेपरफ्राईचे आणखी एक सह संस्थापक आशिष शाह यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन ही माहिती दिली. हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की, ‘माझे मित्र, मेंटॉर, भाऊ अंबरीश मूर्ती आता आपल्यात नाहीत. काल रात्री लेहमध्ये आम्ही त्यांना गमावले. कृपया त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्याचे बळ मिळो यासाठी प्रार्थना करुयात’.

हे सुद्धा वाचा

इन्स्टाग्रामवरील तो व्हिडिओ ठरला शेवटचा

दोन दिवसांपूर्वी अंबरीश यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ शेवटचा ठरला. या व्हिडिओत ते मनाली-लेह हायवेवर बाईक पार्क करुन संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडिओत त्यांना प्रवासात आलेल्या अडचणी त्यांनी सांगितल्या. व्हिडिओच्या सुरुवातीला हा रस्ता चांगला असल्याचे त्यांनी सांगितले. जर देवाने कुठे बाईकर्ससाठी स्वर्ग तयार केला असेल तर त्या स्वर्गासाठीची सर्व रस्ते अशी असतील. फ्लॅट, ब्लॅक टरमॅक!’

पेपरफ्राय कंपनीची स्थापना

अंबरीश मूर्ति यांनी आशीष शाह यांच्यासह पेपरफ्राय कंपनीची स्थापना केली होती. त्यांनी ईबे इंडिया, फिलिपाईन्स आणि मलेशियामध्ये काम केले होते. त्यांनी इंटरनेट आणि मोबाईल असोशिएन ऑफ इंडियाचे उपाध्यक्ष म्हणून काम केले.

इंजिनिअरिंगसोबत एमबीएची डिग्री

मूर्ती यांनी लेव्ही स्ट्रॉस आणि ब्रिटानिया इंडस्ट्रीज सारख्या प्रसिद्ध ब्रँडमध्ये काम केले. त्यांनी कॅडबरी कंपनीत करिअरला सुरुवात केली. प्रुडेंशिअल आयसीआयसीआय मध्ये काम केले. त्यांनी दिल्लीतील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर कोलकत्त्यातील आयआयएममधून एमबीएची पदवी मिळवली.

ट्रेकिंग-बाईकिंगचा थरार

अंबरीश मूर्ती यांचा जन्म 10 सप्टेंबर 1971 साली झाला. त्यांना बाईकिंग आणि ट्रेकिंगची आवड होती. सुट्यांमध्ये ते नेहमी बाईकने लद्दाखला जात होते. त्यांना हा थरार नेहमी अनुभवा वाटत असे. त्यांनी अनेक ठिकाणी ट्रेकिंग केले. त्या अनुभवाची मोठी शिदोरी त्यांच्यासोबत होती.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.