Petrol-Diesel Price : खूषखबर! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात, इतक्या रुपयांनी भाव उतरणार..तुम्हाला मिळणार दिलासा?

Petrol-Diesel Price : पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर घसरण्याची चर्चा रंगली आहे..त्यामागची कारणं समजून घेऊयात..

Petrol-Diesel Price : खूषखबर! पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात, इतक्या रुपयांनी भाव उतरणार..तुम्हाला मिळणार दिलासा?
अच्छे दिन येणार?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Nov 22, 2022 | 6:15 PM

नवी दिल्ली : गेल्या 10 महिन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या भावात (Crude Oil Price in International Market) प्रचंड घसरण झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमतीत (Brent Crude Oil Price) 35 टक्क्यांहून जास्त घसरण झाली आहे. यामुळे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी लवकरच देशात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol And Diesel Price) घसरण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

तज्ज्ञांच्या मते, येत्या काही दिवसात ब्रेंट क्रूड ऑईलच्या किंमती 82 डॉलरवर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, या किंमतीत 5 रुपयांची घसरण होऊ शकते.

गेल्या 10 महिन्यांचा विचार करता, कच्च्या तेलाच्या किंमतीत 35 टक्क्यांची घसरण दिसून आली. 7 मार्च रोजी ब्रेंट क्रूड ऑईलचे दर 139.13 डॉलर प्रति बॅरल होते. त्यानंतर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये 37 डॉलर प्रति बॅरलची घसरण दिसून आली.

हे सुद्धा वाचा

WTI चे दर 7 मार्च रोजी 130.50 डॉलर प्रति बॅरल होते. आता हे दर 80.41 डॉलर प्रति बॅलरवर येऊन ठेपले आहे. या दरम्यान WTI च्या दरात 38 टक्क्यांची घसरण झाली आहे. या मागील काही कारणं पाहुयात..

1. जगभरातील मोठ्या कंपन्या वर्षाच्या शेवटी त्यांचे जूने हेज फंड्स संपविण्याचा विचार करतात. त्यामुळे कच्चा तेलाच्या मागणीत घट येते. त्याचा परिणाम बाजारात दिसून येतो.

2. अमेरिकन स्टॉक्स आणि शेल्समध्ये फायद्याची लाट आली आहे. परिणामी मागणीपेक्षा पुरवठा वाढला आहे. त्यामुळे बाजारात येत्या काही काळात कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण येण्याची शक्यता आहे.

3. चीनमध्ये कोविडने पुन्हा डोके वर काढले आहे. या कारणामुळे वारंवार लॉकडाऊन लावावे लागत आहे. जगभरातील अर्थव्यवस्थांनाही पुन्हा कोविडची लाट येण्याची भीती सतावत आहे. परिणामी कच्च्या तेलाच्या मागणीत घसरण होत आहे.

4. युरोपियन राष्ट्रांनी त्यांच्याच देशात कच्चे तेल शोधण्याची मोहिम हाती घेतली आहे. इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी याविषयीचे संकेत दिले आहे. देशात तेल शोधण्याची व्यापक मोहिम हाती घेण्यात येणार आहे. इतर युरोपियन राष्ट्रांनी हीच मोहिम हाती घेतली आहे.

या सर्व कारणांचा भारतावरही परिणाम होणार आहे. भारत त्याच्या गरजेच्या 85 टक्के क्रूड ऑईलची आयात करतो. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर घसरणीचा परिणाम भारतावर होणार आहे.

तज्ज्ञांच्या मते, येत्या दोन आठवड्यात भारत ब्रेंट क्रूड ऑईल 82 डॉलर प्रति बॅरल खरेदी करेल तर देशांतर्गत किंमतीवर त्याचा परिणाम दिसून येईल. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत 5 रुपये प्रति लिटरची घसरण होऊ शकते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.