Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईची गुढी! दर कपातीचा निर्णय लवकरच, मोदी सरकारने टाकले हे पाऊल

Petrol Diesel Price Today : देशात लवकरच पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येण्याची शक्यता आहे. मोदी सरकारच्या एका निर्णयामुळे हा याविषयीची चर्चा सुरु झाली. अर्थात डिझेलच्या बाबतीत हा निर्णय लागू नाही. पण पेट्रोलचे भाव कमी होण्याची चिन्हं आहेत.

Petrol Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलच्या स्वस्ताईची गुढी! दर कपातीचा निर्णय लवकरच, मोदी सरकारने टाकले हे पाऊल
लवकरच स्वस्ताई
Follow us
| Updated on: Mar 22, 2023 | 8:29 AM

नवी दिल्ली : गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर केंद्र सरकारने जनतेला इंधन दर (Fuel Price) कपातीचे संकेत दिले आहेत. यामुळे देशात आनंदासह स्वस्ताईची गुढी उभारता येईल. लवकरच याविषयीचा निर्णय होऊ शकतो. केंद्र सरकारने सोमवारी कच्चा तेलावरील (Crude Oil) घरगुती उत्पादनावरील विंडफॉल करात (Windfall Tax) 4400 रुपये प्रति टनात 900 रुपयांची कपात केली. आता हा भाव 3,500 रुपये प्रति टन झाला आहे. यामुळे पेट्रोल आणि एव्हिएशन फ्यु्अल (ATF) दोघांची निर्यात लेव्ही मुक्त करण्यात आली आहे. पेट्रोल दर कपातीसाठी हा निर्णय फायदेशीर ठरणार आहे. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती आज किंचित घसरल्या.

पण डिझेलला फटका

डिझेलवरील निर्यात शुल्क (Diesel Export Duty) 0.50 रुपयांवरुन वाढवून 1 रुपये प्रति लिटर करण्यात आली आहे. या निर्णयामुळे डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. नवीन दर 21 मार्चपासूनच प्रभावीपणे लागू करण्यात आली आहेत. देशात आता मालवाहतूक महागले आणि त्याचा फटका वस्तूंच्या दरवाढीत होण्याची भीती आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयावर वाहतूकदारांनी आण सर्वसामान्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हे सुद्धा वाचा

कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलात मोठा फेरबदल सुरु आहे. 22 मार्च रोजी डब्ल्यूटीआई क्रूड ऑईलमध्ये (WTI Crude Oil) 69.33 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) आजचा भाव 75.05 डॉलर प्रति बॅरल आहे. या अपडाऊनमध्ये जनतेला मात्र कोणतीही झळ बसलेली नाही. गेल्या वर्षभरापासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) कोणताही दखल घेण्याजोगा बदल झालेला नाही

राज्यातील प्रमुख शहरातील इंधनाचे दर

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.32 तर डिझेल 92.84 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 106.82 तर डिझेल 93.35 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.44 पेट्रोल आणि डिझेल 93.91 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.43 आणि डिझेल 93.90 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.75 आणि डिझेल 93.28 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.78 तर डिझेल 94.25 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.61 तर डिझेल 93.14 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.25 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.10 आणि डिझेल 92.62 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.67 रुपये तर डिझेल 93.18 रुपये प्रति लिटर

मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.