Petrol Diesel Rate Today : आज एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय, इथे झाले स्वस्त, कुठे महाग

| Updated on: Jun 30, 2023 | 8:42 AM

Petrol Diesel Rate Today : देशात पेट्रोल-डिझेलचे भाव सकाळीच अपडेट झाले आहे. कच्चा तेलात चढउतार होत असले तर भारतीय बाजारात त्याचा परिणाम झालेला नाही. आज या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव कमी झाला तर या ठिकाणी इंधन महागले.

Petrol Diesel Rate Today : आज एक लिटर पेट्रोल-डिझेलचा भाव काय, इथे झाले स्वस्त, कुठे महाग
Follow us on

नवी दिल्ली : जागतिक बाजारात कच्चा तेलात (Crude Oil Price) चढउतार सुरु आहे. बेंच मार्क ब्रेंट क्रूड ऑईलने उसळी घेतली आहे. देशातील तेल वितरण कंपन्यांनी आज सकाळीच, 30 जून रोजी पेट्रोल-डिझेलचे भाव अपडेट केले. कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता दर जाहीर केले. पूर्वी तेल कंपन्या दर 15 दिवसांनी भाव जाहीर करत होत्या. या किंमती पुढे 15 दिवस कायम राहत असत. पण आता केंद्र सरकार बदलल्यापासून हा नियम बदलण्यात आला. आता प्रत्येक दिवशी सकाळी भाव अपडेट करण्यात येतो. सध्या रशिया आणि इतर देशांकडून भारताला स्वस्तात कच्चा तेलाचा पुरवठा होत आहे. कच्चा तेलात चढउतार होत असले तर भारतीय बाजारात त्याचा परिणाम झालेला नाही. आज या शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol Diesel Price) कमी झाला तर या ठिकाणी इंधन महागले.

कच्चा तेलात चढउतार
जागतिक बाजारात कच्चा तेलात चढउतार सुरु आहे. 30 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.38 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.70 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.

गेल्या वर्षांपेक्षा भावात घसरण
आज सकाळीच 6 वाजता पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत. मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईल गगनाला भिडले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलर झाल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चे तेल दणकावून आपटले आहे. किंमती तेव्हापासून 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  • मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 93.27 रुपये प्रति लिटर आहे
  • अहमदनगर पेट्रोल 106.44 तर डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  • अकोल्यात पेट्रोल 106.14 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  • अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  • औरंगाबाद 107.40 पेट्रोल आणि डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  • जळगावमध्ये पेट्रोल 107.22 आणि डिझेल 93.73 रुपये प्रति लिटर
  • कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर
  • लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  • नागपूरमध्ये पेट्रोल 106.06 तर डिझेल 92.61 रुपये प्रति लिटर
  • नांदेडमध्ये पेट्रोल 107.89 तर डिझेल 94.38 रुपये प्रति लिटर
  • नाशिकमध्ये पेट्रोल 106.77 रुपये आणि डिझेल 93.27 रुपये प्रति लिटर
  • परभणी पेट्रोल 109.47 तर डिझेल 95.86 रुपये प्रति लिटर
  • पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  • रायगड पेट्रोलचा भाव 105.86 आणि डिझेल 92.36 रुपये प्रति लिटर
  • सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.20 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर
  • ठाणे पेट्रोलचा दर 105.97 रुपये तर डिझेल 92.47 रुपये प्रति लिटर

भाव एका SMS वर

  1. भारतीय तेल विपणन कंपन्या दररोज सकाळी 6 वाजता इंधनाचे नवीन दर जाहीर करण्यात येतात.
  2. देशात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो.
  3. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
  4. पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
  5. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
  6. इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
  7. बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
  8. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
  9. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.
  10. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.