Petrol Diesel Price Today : परभणीचा रेकॉर्ड! नांदेडसह औरंगाबाद पाठोपाठ, पेट्रोल-डिझेल महागले

Petrol Diesel Price Today : कच्चा तेलाचे भाव आज नरमले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून किंमतीत किंचित घसरण झाली आहे. राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत तर काही शहरातील भाव कमी झाले आहेत.

Petrol Diesel Price Today : परभणीचा रेकॉर्ड! नांदेडसह औरंगाबाद पाठोपाठ, पेट्रोल-डिझेल महागले
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 8:36 AM

नवी दिल्ली : कच्चा तेलाचे भाव सातत्याने वाढत आहे. ओपेक आणि रशियाने तेल उत्पादन घटवले. त्यामुळे जगभरात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ अपेक्षित आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात 101.28 दशलक्ष बॅरल प्रति दिवस तर दुसऱ्या आठवड्यात ही मागणी 100.77 दशलक्ष बॅरल प्रति दिवसांवर आली. मार्च महिन्यात कच्चा तेलाची मागणी घटली होती. एप्रिल आणि मे महिन्यात आता कच्चा तेलाची मागणी काय असेल यावर दरवाढीचा निर्णय होऊ शकतो. मंगळीवार, 11 एप्रिल रोजी, डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 79.92 डॉलरवर पोहचल्या. तर ब्रेंट क्रूड ऑईल (Brent Crude Oil) 84.32 डॉलर प्रति बॅरलवर आहे. या दरवाढीमुळे देशातील काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या किंमती बदलल्या आहेत. काही राज्यात इंधन स्वस्त तर काही शहरात इंधनाचे दर वाढले आहेत.

परभणीत सर्वाधिक वाढ राज्यात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी वाढ झाली. परभणी, नांदेड, जालना, औरंगाबादमध्ये भाव जास्त आहेत. या शहरात अनुक्रमे पेट्रोलचा भाव 109.33, 108.37, 108.20 आणि 108.07 रुपये लिटर आहे. तर डिझेलच्या सर्वाधिक किंमत औरंगाबादमध्ये आहे. डिझेलचा भाव 96.02 रुपये आहे.

पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार? तर सोशल मीडियावर आतापासूनच पेट्रोल-डिझेल 150 रुपयांच्या घरात जाणार असल्याच्या बातम्यांनी धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेसह दोस्त राष्ट्रांनी नरमाईची भूमिका घेतल्यास आता असलेल्या दबावतंत्राला आळा बसू शकतो. तर रशियाने जर भारताला कमी किंमतीत इंधन पुरवठा केल्यास किंमतीत फार मोठी वाढ होण्याची शक्यता नाही. जर तरच्या या गणितात कुठलाच तोडगा निघाला नाहीतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ होईल. पण ती साधारणतः 10-12 रुपयांच्या घरात असेल.

हे सुद्धा वाचा

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.62 तर डिझेल 93.13 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.45 रुपये आणि डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.14 तर डिझेल 93.65 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 108.07 पेट्रोल आणि डिझेल 96.02 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 107.33 आणि डिझेल 93.83 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.56 आणि डिझेल 93.09 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.83 तर डिझेल 94.30 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.37 तर डिझेल 94.83 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.44 रुपये आणि डिझेल 92.95 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.14 आणि डिझेल 92.66 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर

करासंबंधी असा झाला बदल

  1. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 22 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली होती
  2. देशात गेल्यावर्षी 21 मे रोजीनंतर इंधनाच्या किंमती मोठा बदल दिसून आला
  3. पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये तर डिझेलवर प्रति लिटर 6 रुपयांची कपात झाली
  4. त्यानंतर काही राज्यांनी ही त्यांच्या मूल्यवर्धित करात (Value Added Tax-VAT) कपात केली होती
  5. महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये 5 तर डिझेलवर 3 रुपयांचा व्हॅट घटवला
  6. महाराष्ट्रात नव्याने आलेल्या सरकारने 14 जुलै 2022 रोजी हा निर्णय घेतला होता
  7. हिमाचल प्रदेश सरकारने यावर्षीच्या सुरुवातीला डिझेलवर 3 रुपये व्हॅट लावला
  8. पंजाब सरकारने पेट्रोल-डिझेलवर प्रति लिटर 90 पैसे सेस लावला
  9. केरळचे अर्थमंत्री के एन बालगोपाल यांनी पेट्रोल-डिझेलवर 2 रुपये प्रति लिटर सामाजिक सुरक्षा उपकर (Cess) लावला
  10. पेट्रोल आणि डिझेल कमी किंमतीत विक्री केल्याने 21,200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तेल कंपन्यांची ओरड आहे

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.