Petrol, Diesel Price Hike : पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) किमतींमध्ये वाढ सुरूच आहे. आज पुन्हा एकदा इंधनाच्या (Fuel) दरामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये तब्बल पाचवेळा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढले आहेत. आयओसीएलने दिलेल्या माहितीनुसार आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटर मागे प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. नव्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलचा दर प्रति लिटर 99.11 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेल 89.87 रुपये प्रति लिटर झाले आहे. मुंबईत पेट्रोलचा भाव प्रति लिटर 113.88 रुपयांवर पोहोचला आहे. तर डिझेलचा दर वाढून 97.55 रुपये झाला आहे. देशभरातील जवळपास सर्वच महानगरांमध्ये पेट्रोलच्या किमतीने शंभरचा टप्पा पार केला आहे.
आज पेट्रोलच्या दरात प्रति लिटर मागे 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ करण्यात आली आहे. नव्या दरानुसार राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 113.88 तर डिझेल 97.55 रुपयांवर पोहोचले आहे. तर औरंगाबादमध्ये पेट्रोल 113.37 आणि डिझेल 98.35 रुपये प्रति लिटर आहे. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 113.42 तर डिझेल 96.20 रुपये लिटर आहे. पुण्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 112.87 आणि 95.64 रुपये इतके आहेत. तर उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल 113.06 रुपये लिटर आणि डिझेल 95.85 रुपये लिटर इतके आहे.
गेल्या सहा दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये पाच वेळा वाढ झाली आहे. 22 मार्चनंतर केवळ 24 मार्च रोजी पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर होते. गेल्या सहा दिवसांमध्ये इंधनाचे दर तब्बल चार रुपयांनी महाग झाले आहेत. नव्या दरानुसार मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगाना, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-कश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलचे दर हे 100 रुपयांपेक्षा अधिक आहेत.
Price of petrol & diesel in Delhi at Rs 99.11 per litre & Rs 90.42 per litre respectively today (increased by 50 & 55 paise respectively)
In Mumbai, the petrol & diesel prices per litre at Rs 113.88 & Rs 98.13 (increased by 53 paise & 58 paise respectively)
(File pic) pic.twitter.com/7Eg5Optru1
— ANI (@ANI) March 27, 2022
आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?
यात्रा ऑनलाइन लवकरच घेऊन येतेय स्वतः चे IPO, सेबी पुढे मांडला प्रस्ताव!