Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात! पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात वाढ, वाहनधारकांना लवकरच दिलासा

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लवकरच कपातीचे संकेत मिळत आहेत.

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत लवकरच कपात! पेट्रोलियम कंपन्यांच्या नफ्यात वाढ, वाहनधारकांना लवकरच दिलासा
पेट्रोल डिझेल होणार स्वस्त?
Follow us
| Updated on: Jan 06, 2023 | 9:28 PM

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol Diesel Price) गेल्या 6 महिन्यांपासून कुठलीही वाढ करण्यात आलेली नाही. मे महिन्यानंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. परंतु येत्या काही दिवसात वाहनधारकांना मोठा दिलासा मिळू शकतो. देशात तीन ते चार वर्षांत इंधनाचे दर झपाट्याने वाढल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या (Common Man) खिशावर मोठा बोजा पडला आहे. सर्वच क्षेत्रावर इंधन दरवाढीचा मोठा परिणाम झाला आहे. पण आता पेट्रोल-डिझेल दर कपातीचे (Price Reduce) संकेत मिळत आहेत.

देशातील तेल कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 10 रुपयांचा फायदा होत आहे. पण मागील नुकसान भरपाई यातून भरुन काढण्यात येत असल्याचा दावा कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे पेट्रोलच्या किरकोळ भावात कसलाच बदल करण्यता आलेला नाही.

पेट्रोलवर तेल कंपन्यांना फायदा होत असला तरी डिझेलच्या आघाडीवर त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. डिझेल विक्रीवर कंपन्यांना सध्या 6.5 रुपये प्रति लिटर नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळे कंपन्यांसाठी कही खुशी कही गमचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (IOC), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने (HPCL) गेल्या वर्षीपासून दरवाढ केलेली नाही.

एप्रिलनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत या तेल विपणन कंपन्यांनी कुठलीच वाढ केलेली नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही क्रुड ऑईलच्या किंमतीत भरभक्कम वाढ झालेली नाही. मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केली आहे.

आयसीआयसीआय सिक्योरिटीजने याविषयीचा अहवाल दिला आहे. त्यात 24 जून 2022 च्या शेवटच्या आठवड्यात पेट्रोलवर 17.4 रुपये प्रति लिटर तर डिझेलवर 27.7 रुपये प्रति लिटर नुकसान सहन करावे लागले. तेल विपणन कंपन्यांना मोठे नुकसान झाले.

तिसऱ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर 2022) पेट्रोलच्या विक्रीवर 10 रुपये प्रति लिटरचा फायदा झाला आहे. तर डिझेलवरील नुकसान कमी झाले आणि ते 6.5 रुपये प्रति लिटर झाले आहे. या तीनही तेल कंपन्यांनी 6 एप्रिल 2022 रोजीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत बदल केलेला नाही.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या दरम्यान कच्च्या तेलाच्या किंमती एकावेळी 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहचल्या होत्या. पण नंतर त्या सर्वात नीच्चांकी पातळीवर पोहचल्या होत्या. या महिन्यात तर किंमती 78.09 डॉलरपर्यंत कमी झाल्या. त्याचा फायदा कंपन्यांना झाला.

केंद्रीय मंत्री पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी तेल विपणन कंपन्यांचा तोटा अद्यापही भरून निघाला नसल्याचा दावा केला आहे. पण या कंपन्याचा नफ्याचा सौदा कायम राहिल्यास लवकरच सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेलवर दिसाला मिळण्याची शक्यता आहे.

मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.