Petrol-Diesel Price : कच्चा तेलालाच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर
आतंरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात सतात्याने चढ उतार सुरू आहे.
Petrol-Diesel Price : आतंरराष्ट्रीय बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या (Crude oil) किमतीमध्ये घसरण झाल्याचे पहायला मिळत आहे. रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर कच्च्या तेलाच्या दरात सतात्याने चढ उतार सुरू आहे. तीन आठवड्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर तब्बल 139 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले होते. मात्र गेल्या दोन आठवड्यात पुन्हा एकदा दर नियंत्रणात आले असून, आज कच्च्या तेलाचे भाव हे 100 डॉलर प्रति बॅरलच्या खाली आले आहेत. जागितक बाजारात सातत्याने कच्च्या तेलाच्या दरात चढ -उतार सुरू असताना आज पेट्रोलियम कंपन्यांकडून देशात इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील देशात पेट्रोल (Petrol), डिझेलच्या (Diesel) दरात कोणताही बदल झाला नसून इंधनाचे भाव स्थिर आहेत. चार नोव्हेंबर 2021 पासून इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पाच राज्यातील निवडणुंकाच्या निकालानंतर भाव वाढीचा अंदाज व्यक्त करण्यात येत होता मात्र अद्यापही दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.
प्रमुख शहरातील इंधनाचे दर
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.
गेल्या चार नोव्हेंबरपासून देशात इंधनाचे दर स्थिर
चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल डिझेलवरील सरचार्ज कमी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतात पेट्रोल प्रति लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हा कच्च्या तेलाचे भाव देखील कमी होते. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा दबाव हा पेट्रोलियम कंपन्यावर आल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
Gold, silver prices : सोन्याच्या दरात प्रति तोळा चार हजारांची घसरण; गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले
Bank of Baroda देतीये स्वस्तात घर खरेदीची संधी; 24 मार्चला बँकेकडून गहान संपत्तीचा लिलाव
जपानी कंपनी Suzuki Motor भारतात 1.26 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार, इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला चालना