Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, उद्यापासून किंमती उतरण्याचा अंदाज, इतक्या रुपयांचा मिळू शकतो दिलासा..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याचा अंदाज बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत..

Petrol-Diesel : पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त, उद्यापासून किंमती उतरण्याचा अंदाज, इतक्या रुपयांचा मिळू शकतो दिलासा..
इंधन होणार स्वस्त?Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 04, 2022 | 7:09 PM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे (Crude Oil) दर सहा महिन्यांपासून नीच्चांकी पातळीवर असतानाही सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळालेला नाही. मे महिन्यापासून इंधन दरवाढ न झाल्याचे तेवढं समाधान आहे. पण तज्ज्ञांच्या मते, 5 डिसेंबर पासून देशात इंधन दर कपात होऊ शकते. सकाळी याविषयीच्या निर्णयाची कंपन्या अंमलबजावणी करण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) घसरण होऊ शकते.

झी बिझनेसने दिलेल्या वृत्तानुसार, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठी घसरण होऊ शकते. 5 डिसेंबर रोजी हा नवीन दर बघायला मिळू शकतात. गेल्या अनेक महिन्यांपासून इंधन दर कमी होण्याच्या प्रतिक्षेत वाहनधारक आहेत. पण उद्या ही खूशखबर मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

5 डिसेंबर रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 5 रुपयांपर्यंत कपात होण्याचा दावा तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. यापूर्वी ही असे दावे करण्यात आले आहेत. पण तज्ज्ञांच्या मते, गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारकडून हे गिफ्ट मिळू शकते.

हे सुद्धा वाचा

देशात सध्या क्रुड ऑईलच्या किंमती $90 प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत. सध्या या किंमती $82 च्या जवळपास आहेत. नोव्हेंबर महिन्यात क्रूड ऑईलच्या किंमतीत 7% घसरण दिसून आली. त्यामुळे जनतेतही पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची मागणी जोर धरत आहे.

झी बिझनेसने तज्ज्ञांचे मत घेत, याविषयीचे वृत्त दिले आहे, त्यानुसार, आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्च्या तेलाच्या दरात घसरण होणार असल्याचा फायदा दिसून येईल. पेट्रोल-डिझेलच्या दरात पाच रुपयांपर्यंत घसरण होईल. त्यामुळे वाहनधारकांना मोठा दिलासा मिळेल.

कच्च्या तेलाच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घसरण होत आहे. परंतु, पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत काहीच बदल झालेला नाही. तेल कंपन्या नुकसानीचा दावा करत होत्या. पण त्यांचे नुकसान भरुन निघाल्याचा दावा करण्यात येत आहे.

क्रुड ऑईलच्या किंमतीत मार्च 2022 पासून आतापर्यंत 27% घसरण दिसून आली आहे. क्रुड ऑईलचे दर सातत्याने $90 प्रति बॅरलच्या खाली आहेत. त्यामुळे किंमतीत घसरण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल
'राणेंना महाराष्ट्र जाळायचाय का?', महिला खासादारानं थेट सवाल करत झापल.
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं
खोक्याला शिरूर कासार पोलीस ठाण्यातून हलवलं.
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप
'फडणवीसांनी तुमची जीभ छाटली की..'; औरंगजेबाशी तुलना अन् शिंदेंचा संताप.
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं
नागपुरातील राड्यानंतर शिंदेंनी काँग्रेसच्या नेत्यांना धारेवर धरलं.
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार
'या' राजकीय पक्षाला मोठा धक्का, माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार.
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा
'...तो पुरूष नाहीच', सुळेंची मुंडेंवर जहरी टीका अन् केला खळबळजनक दावा.
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी
मुख्यमंत्र्यांनी सांगितली नागपूर घटनेची A to Z स्टोरी.
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन
विधानभवनात पत्रकारांना धक्काबुक्की, माध्यमांच्या प्रतिनिधींचंच आंदोलन.
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं
'अजितदादा... जरा जमिनीवर या', करूणा शर्मांनी अजित पवारांना फटकारलं.
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप
हल्ले करणारे चेहरे ओळखीचेच; नागपूर प्रकरणावर राऊतांचा गंभीर आरोप.