या शहरात 7 रुपये स्वस्त झाले पेट्रोल, तरीही देशात सर्वात महाग!

Petrol-Diesel Price | देशात 14 मार्च रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती दोन रुपयांनी स्वस्त झाल्या. केंद्र सरकारने याविषयीची घोषणा केली होती. या शहरात तर जवळपास 7 रुपयांनी किंमती स्वस्त झाल्या. पण तरीही देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल याच शहरात मिळत आहे.

या शहरात 7 रुपये स्वस्त झाले पेट्रोल, तरीही देशात सर्वात महाग!
देशात सर्वात महागडे पेट्रोल-डिझेल या शहरात
Follow us
| Updated on: Mar 20, 2024 | 10:31 AM

नवी दिल्ली | 20 March 2024 : देशातील वाहनधारकांना 14 मार्च रोजी केंद्र सरकारने किंचित दिलासा दिला. पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 2 रुपयांची कपात करण्यात आली. 15 मार्च रोजीपासून ही कपात लागू झाली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर केलेली ही दर कपात आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही. देशात डिझेलवर 58 लाख जड वाहनं धावतात. तर पेट्रोलवर जवळपास 6 कोटी कार आणि 27 कोटी दुचाकी धावतात. या सर्व वाहनधारकांना फुल ना फुलाची पाकळी मिळाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण देशातील या शहरात 7 रुपयांनी किंमती स्वस्त होऊनही नागरिकांना सर्वाधिक दरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे.

राजस्थानमध्ये सर्वाधिक स्वस्त

खरी लॉटरी तर राजस्थानमधील नागरिकांना लागली आहे. देशभरात पेट्रोल-डिझेलवर दोन रुपयांची कपात करण्यात आली. तर राजस्थानमधील लोकांना अजून एक फायदा झाला. येथील सरकारने इंधनावरील वॅट कमी केला. त्यामुळे देशात इतरत्र इंधनाचे दर वाढलेले असताना राजस्थानमधील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. जयपुर मध्ये पेट्रोलचा भाव 108.83 रुपये प्रति लिटरवरुन घसरुन 104.88 रुपये लिटरपर्यंत खाली घसरला.

हे सुद्धा वाचा

या शहराला मोठा दिलासा

पाकिस्तानच्या सीमालगतच्या श्रीगंगानगर जिल्ह्याला सर्वाधिक फायदा झाला. या शहरात सर्वात महाग पेट्रोल-डिझेल मिळते. मे 2022 पासून ते या 15 मार्चपर्यंत या शहरातील नागरिकांना सर्वात महाग दराने पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागले. गेल्या जवळपास दोन वर्षांत येथे पेट्रोल 113 रुपये प्रति लिटरने खरेदी करावे लागत होते. आता पेट्रोल कपातीचा सर्वाधिक फायदा पण याच शहराला मिळाला आहे. 14 आणि 15 मार्च दरम्यान श्रीगंगानगरमध्ये पेट्रोलच्या किंमतीत 7.13 रुपयांची घसरण दिसून आली. त्यानंतर येथे पेट्रोलचा भाव कमी होऊन 106.26 रुपये प्रति लिटरवर आले. तरीही हा दर देशात सर्वात जास्त आहे. देशात महागड्या दराने येथील नागरिकांना पेट्रोल भरावे लागते.

नागरिकांना डब्बल गिफ्ट

श्रीगंगनगरमधील रहिवाशांना दुप्पट फायदा झाला. केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करण्याअगोदरच राज्यातील भजनलाल सरकारने पेट्रोल-डिझेलवरील मूल्यवर्धिक कर (VAT) कमी केला. त्यामुळे येथील नागरिकांना एकाचवेळी डब्बल गिफ्ट मिळाले. राजस्थानमधील विविध शहरात 1 रुपये 40 पैसे ते 5 रुपये 30 पैशांदरम्यान तर डिझेलमध्ये 1 रुपये 34 पैसे ते 4 रुपये 85 पैशांपर्यंत कपात झाली. त्यातच केंद्र सरकारने अजून दोन रुपयांची कपात केल्याने नागरिकांना दुप्पट फायदा झाला.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.