Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलचे भाव काय? जाणून घ्या ही प्रक्रिया ..
Petrol-Diesel Price : तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे भाव जाणून घ्यायचे आहे?
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) कच्च्या तेलाचे भाव (Crude Oil Prices) कमी जास्त होतात. त्याचा परिणाम भारतीय पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरही (Petrol-Diesel Price) होतो. पण सध्या केंद्र सरकारच्या धोरणामुळे मे महिन्यापासून इंधनाचे दर स्थिर आहेत. उलट उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे तेलाचे दर कमी झाले आहेत. गेल्या सहा महिन्यांपसून किंमतीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.
आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती पुन्हा कमी झाल्या आहेत. केंद्र सरकारने तेल कंपन्यांना अनुदानाचा बुस्टर डोस दिला आहे. इतकेच नाही तर पुढील काही महिन्यांपासून इथेनॉलचा वापर 20 टक्क्यांवर वाढणार आहे. त्यामुळे तिन्हीचा परिणाम होऊन किंमती कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. नवे दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर करांचा त्यात समावेश होतो.
कमिशन, व्हॅट, इतर करांचा समावेश झाल्यानंतर मुळ किंमतीत किती तरी पटीने वाढ होते.सध्या मुळ किंमतीपेक्षा या किंमती दुप्पट होऊन अधिक आहे. या सर्व करामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर मुळ किंमतीपेक्षा वाढलेले दिसून येतात.
तुम्ही एसएमएसद्वारे (SMS) पेट्रोल डिझेलचे दैनंदिन दर देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलचे ग्राहक RSP आणि तुमचा शहर कोड टाइप करून 9224992249 वर आणि BPCL ग्राहक RSP आणि त्यांचा शहर कोड 9223112222 या क्रमांकावर एसएमएस पाठवून दर जाणून घेऊ शकतात.
तर HPCL ग्राहक HP price आणि त्यांचा शहर कोड लिहून आणि 9222201122 या क्रमांकावर पाठवल्यानंतर त्यांना ताजे दर एसएमएसद्वारे मिळतील. सकाळी 6 वाजेनंतर एसएमएस केल्यास तुम्हाला ताजे दर समजतील.