नवी दिल्ली – देशातील प्रमुख तेल कंपन्या आज गुरुवारी 26 मे रोजी पेट्रोल आणि डिझेलचे (Petrol-Diesel) नवीन दर जाहीर करण्यात आले आहेत. देशभरातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज कोणताही बदल झालेला नाही. केंद्र सरकारने (Central government) गेल्या आठवड्यात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदीवर आकारण्यात येणाऱ्या उत्पादन शुल्कात (Excise duty) कपात केली होती. त्यानंतर रविवार 22 मेपासून देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे. आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर आहे.
जिल्हा | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
अहमदनगर | 111.43 | 95.90 |
अमरावती | 111.87 | 96.35 |
औरंगाबाद | 112.97 | 98.89 |
गडचिरोली | 111.96 | 96.46 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
मुंबई | 111.35 | 97.28 |
नागपूर | 111.41 | 95.92 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
ठाणे | 110.78 | 95.25 |
दिल्लीशिवाय मुंबईत आज एक लिटर पेट्रोलचा दर 111.35 रुपये आणि डिझेलचा दर 97.28 रुपये आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 102.63 रुपये आणि डिझेलचा दर 94.24 रुपये प्रति लिटर आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचा दर 106.03 रुपये आणि डिझेलचा दर 92.76 रुपये प्रति लिटर आहे. देशातील 4 महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलच्या सध्याच्या किमतींची तुलना केल्यास राजधानी दिल्लीत तेलाच्या किमती सर्वात कमी आहेत तर मुंबईत सर्वात महाग आहे. तुम्हाला तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर पहायचे असतील, तर तुम्ही या लिंकवर क्लिक करून तपासू शकता.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. असे असतानाही देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईपासून दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल ११५ डॉलरवर पोहोचले आहेत. बुधवारी, 25 मे रोजी, WTI क्रूडच्या किमती सुमारे डॉलर 111 आणि ब्रेंट क्रूडच्या किमती डॉलर 115 च्या आसपास व्यवहार करत आहेत.
याचा सरळ अर्थ असा की केंद्र सरकार आपल्या नफ्याशी तडजोड करून देशवासीयांना महागड्या पेट्रोल आणि डिझेलपासून दिलासा देत आहे.