Petrol Diesel Rate Today : इंधनाचे दर जारी! गेल्या 29 दिवसांपासून स्थिर असलेल्या दरात आज काय बदल?

Petrol Diesel Rate Today : 22 मार्च ते सहा एप्रिलपर्यंत देशात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा देखील अधिक वाढले होते.

Petrol Diesel Rate Today : इंधनाचे दर जारी! गेल्या 29 दिवसांपासून स्थिर असलेल्या दरात आज काय बदल?
पेट्रोल डिझेलचे आजचे दर Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: May 05, 2022 | 6:30 AM

नवी दिल्ली : सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Rate Today) जाहीर केलेत. गेले काही दिवस पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणतीही भाववाढ झालेली नाही. दरम्यान, सलग तीस दिवस आता पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असल्याचं आकडेवारीतून स्पष्ट झालं. गुरुवारीदेखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या 30 दिवसात तेल कंपन्यांनी कोणतीही भाववाढ पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केलेली नसल्यानं हा एक दिलासा मानला जातो आहे. गेल्या महिन्याभरापूर्वी कच्च्या तेलाच्या (Crude Oil) किंमती प्रचंड वाढलेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल-डिझेलच्या दरात दररोज दरवाढ नोंदवली जात होती. मात्र आता कच्च्या तेलाच्या किंमती वाढलेल्या नसल्यामुळे इंधनाचे दर स्थिर असल्याचं पाहायला मिळतंय. ब्रेंट क्रूडचे दर हे आता वाढून 108.9 डॉलर प्रति बॅरल झाले आहेत. तर WTI क्रूज 3.79 टक्क्यांनी वाढून 1.06.3 डॉल प्रति बॅरल वाढलेत. आंतरराष्ट्रीय बाजारात (International Market) आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ नोंदवण्यात आलीय.

कधीपासून दर स्थिर?

22 मार्च ते सहा एप्रिलपर्यंत देशात पेट्रोल, डिझेलचे दर प्रति लिटर मागे दहा रुपयांपेक्षा देखील अधिक वाढले. मात्र गेले सलग 30 दिवस इंधनाचे दर स्थिर आहेत. दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 105.41 रुपये असून, डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर 104.77 रुपये लिटर आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 110.85 व 100.94 रुपये लिटर आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 115.12 रुपये असून, एका लिटर डिझेलसाठी 99.83 रुपये मोजावे लागत आहेत.

थोडक्यात पण महत्त्वाचं…

  1. राज्यात सर्वात महाग पेट्रोल परभणीत, परभणीत पेट्रोलचा दर 123.51 रुपये तर डिझेल 106 रुपये प्रति लीटर
  2. मुंबईत पेट्रोल प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेल 105.41 रुपये लिटर
  3. नागपूरमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 120.40 असून, डिझेल 103.73 रुपये लिटर
  4. औरंगाबादमध्ये एक लिटर पेट्रोलचा भाव 121.13 रुपये आहे, तर डिझेल 103.79 रुपये लीटर
  5. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.20 आणि 103.10 रुपये प्रति लिटर

पाहा व्हिडीओ :

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.