Petrol Diesel Price Today : सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील दर काय?

त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते. (Petrol Diesel Price Today 07 May 2021)

Petrol Diesel Price Today : सलग चौथ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, मुंबई, पुण्यासह इतर जिल्ह्यातील दर काय?
पेट्रोल-डिझेल दर
Follow us
| Updated on: May 07, 2021 | 11:05 AM

मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दररोज सातत्याने चढ-उतार होत असतात. गेल्या चार दिवसांपासून पेट्रोलसह डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागत आहे. गेल्या मंगळवार, बुधवार आणि गुरुवारी या तीन दिवसात पेट्रोल-डिझेलच्या दरात तेजी दिसून येत आहे. (Petrol Diesel Price Today 07 May 2021)

सलग चार दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

गेल्या दोन महिन्यांपासून म्हणजे मार्च आणि एप्रिलमध्ये काही दिवस सतत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होत होती. विशेष म्हणजे 4 मेपूर्वी 23 फेब्रुवारीला पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत शेवटची वाढ झाली होती. तर मार्चमध्ये तीन दिवस आणि एप्रिलमध्ये एक दिवस किंमतीत घट झाली होती.

दररोज सकाळी 6 च्या दरम्यान तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जारी केले जातात. Goods Return या वेबसाईटने आज पेट्रोल-डिझेलचे दर जारी केले आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींचा परिणाम आवश्यक गोष्टींवर होतो. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष दररोज बदलणाऱ्या पेट्रोल डिझेलच्या किंमतीवर असते.

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमती

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किंमतीतही वाढ झाली आहे. ओमान, दुबई आणि ब्रेंट क्रूड या ठिकाणी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 68.35 डॉलर इतकी आहे. मागील दिवसाच्या तुलनेत यात 2.58 टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्यावर्षी कोरोना प्रादुर्भावानंतर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 19.90 इतकी झाली होती.

राज्यातील सर्वात महाग पेट्रोल कुठे?

महाराष्ट्रातील सर्वात महाग पेट्रोल हे नांदेडमध्ये पाहायला मिळत आहे. नांदेडमध्ये पेट्रोलचा दर हा 99.57 रुपये प्रतिलीटर इतका आहे. त्यापाठोपाठ परभणीमध्ये 99.25 रुपये किंमतीने पेट्रोलची विक्री होत आहे. त्याशिवाय परभणीत डिझेलची विक्री सार्वाधिक दराने होत आहे. नांदेड शहरात डिझेलचा दर 89.38 रुपये इतका आहे.

महाराष्ट्रातील जिल्ह्यांचे पेट्रोल-डिझेलचे दर 

क्रमांक शहरे पेट्रोल (रुपये) डिझेल (रुपये)
1 अहमदनगर ₹ 98.14 ₹ 87.97
2 अकोला ₹ 97.47 ₹ 87.36
3 अमरावती ₹ 99.13 ₹ 88.96
4 औरंगाबाद ₹ 98.02 ₹ 87.86
5 भंडारा ₹ 98.30 ₹ 88.16
6 बीड ₹ 99.21 ₹ 89.02
7 बुलडाणा ₹ 98.20 ₹ 88.07
8 चंद्रपूर ₹ 97.51 ₹ 87.41
9 धुळे ₹ 97.97 ₹ 87.82
10 गडचिरोली ₹ 98.23 ₹ 88.10
11 गोंदिया ₹ 98.76 ₹ 88.60
12 मुंबई उपनगर ₹ 97.77 ₹ 88.97
13 हिंगोली ₹ 98.30 ₹ 88.15
14 जळगाव ₹ 98.12 ₹ 87.95
15 जालना ₹ 98.68 ₹ 88.49
16 कोल्हापूर ₹ 98.61 ₹ 88.45
17 लातूर ₹ 98.44 ₹ 88.28
18 मुंबई शहर ₹ 97.61 ₹ 88.82
19 नागपूर ₹ 97.50 ₹ 87.39
20 नांदेड ₹ 99.57 ₹ 89.38
21 नंदूरबार ₹ 98.70 ₹ 88.52
22 नाशिक ₹ 97.23 ₹ 87.09
23 उस्मानाबाद ₹ 98 ₹ 87.86
24 पालघर ₹ 97.30 ₹ 87.14
25 परभणी ₹ 99.25 ₹ 89.04
26 पुणे ₹ 97.94 ₹ 87.78
27 रायगड ₹ 98.34 ₹ 88.14
28 रत्नागिरी ₹ 98.99 ₹ 88.79
29 सांगली ₹ 97.39 ₹ 87.27
30 सातारा ₹ 98.04 ₹ 87.90
31 सिंधुदुर्ग ₹ 99.12 ₹ 88.94
32 सोलापूर ₹ 97.49 ₹ 87.37
33 ठाणे ₹ 97.15 ₹ 86.99
34 वर्धा ₹ 97.86 ₹ 87.73
35 वाशिम ₹ 97.93 ₹ 87.80
36 यवतमाळ ₹ 98.91 ₹ 88.74

दररोज 6 वाजता किमती बदलतात

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.

पेट्रोल डिझेलचे दर अशा प्रकारे तपासा

एसएमएसद्वारे आपण पेट्रोल डिझेलची किंमत शोधू शकता. दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल डिझेलचे दर अद्ययावत केले जातात. इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, आपल्याला आरएसपीसह आपला शहर कोड टाइप करावा लागेल आणि 9224992249 या क्रमांकावर एसएमएस पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा कोड वेगळा आहे. आपण हे आयओसीएल वेबसाईटवरून पाहू शकता.

त्याच वेळी, आपल्या शहरातील पेट्रोल डिझेलची किंमत आपण बीपीसीएल ग्राहक RSP 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक यांना 9222201122 संदेश पाठवून जाणून घेऊ शकता. (Petrol Diesel Price Today 07 May 2021)

संबंधित बातम्या : 

मोदींनी मिटींगमध्येही स्वत:चीच ‘मन की बात’ची टेप लावली, झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची टीका

Tata च्या गाड्यांवर 65000 रुपयांपर्यंतचा डिस्काऊंट, Tiago, Harrier, Nexon चाही समावेश

राजधानी, शताब्दी, दुरांतो आणि वंदे भारत यांच्यासह 44 गाड्या रद्द, तिकिटांचे पैसे असे मिळवा परत, एका क्लिकवर संपूर्ण लिस्ट

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.