Petrol-Diesel Price : कच्चा तेलाच्या भावात वाढ, पेट्रोल-डिझेलचे आजचे दर काय
Petrol-Diesel Price : कच्चा तेलाचे भाव वधारल्याने आज पेट्रोल-डिझेलच्या दरात काय बदल झाला?
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल (Crude Oil Price) पुन्हा एकदा महागले. मध्यंतरी कच्चे तेल 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. त्यानंतर हे दर घसरले. 80 डॉलर प्रति बॅरलपर्यंत दर खाली आले. आता क्रूड ऑईलच्या किंमतीत पुन्हा वाढ झाली. या किंमतींचा भारतीय तेल विपणन कंपन्यांवर (Indian Oil Marketing Companies) परिणाम होतो. त्यांना त्या दरांनी कच्चे तेल खरेदी करावे लागते. आज 20 जानेवारी 2023 रोजी देशात कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या भावात बदल केला नाही. देशाच्या काही भागात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत (Petrol-Diesel Price) तफावत ही करांमुळे दिसून येते.
देशात 22 मे रोजीपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कुठलाही मोठा बदल झालेला नाही. काही पैशांची तफावत दिसून येते. परंतु, किंमती स्थिर आहेत. तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर जाणून घेण्यासाठी तुम्हाला पेट्रोल पंपावर जाण्याची गरज नाही. एका एसएमएसवर ताजे भाव जाणून घेता येतील.
देशातील तेल विपणन कंपन्यांनी (OMCs) आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव सकाळीच अपडेट केले आहे. 20 जानेवारी रोजी देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यात कोणताही बदल झालेला नाही. ब्रेंट क्रूड ऑईल 1.18 डॉलर (1.39%) वधारले. आज 86.16 डॉलर प्रति बॅरलने विक्री होत आहे. तर डब्ल्यूटीआई 0.47 डॉलर (0.59%) वाढून 80.80 डॉलर प्रति बॅरल विक्री होत आहे.
22 मेपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात केली. तर काही राज्य सरकारांनी व्हॅट कमी केला. त्याचा फायदा वाहनधारकांना मिळाला. त्यांना दहा रुपयांच्या जवळपास कमी दराने पेट्रोल-डिझेल मिळण्यास सुरुवात झाली.
आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर, मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर, कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये आणि डिझेल 92.76 रुपये प्रति लिटर तर चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर आहे.
तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.
पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे (How to check diesel petrol price daily through SMS) जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.
तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.