Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांची बल्ले बल्ले, कच्चे तेल गडगडले, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

Petrol-Diesel Price : कच्चा तेलाचे भाव सातत्याने घसरणीवर आहेत, तेल कंपन्यांना तोटा भरुन काढण्यासाठी सोन्याहून पिवळी संधी आहे.

Petrol-Diesel Price : तेल कंपन्यांची बल्ले बल्ले, कच्चे तेल गडगडले, आजचा पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
आजचा दर काय
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:29 AM

नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांसाठी गेल्या दोन आठवड्यांपासून अच्छे दिन सुरु आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव (Crude Oil Price) सातत्याने घसरत आहेत. त्याचा फायदा तेल विपणन कंपन्यांना होत आहे. शुक्रवारी ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड ऑईलच्या किंमती घसरल्या. या भावावरच देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) अवलंबून असतात. गेल्या सहा महिन्यांहून अधिका काळापासून पेट्रोल-डिझेलच्या भावात मोठा बदल झालेला नाही. रोजच्या दरात 5 ते 30 पैशांपर्यंतची तफावत दिसते. प्रत्येक राज्यात आणि शहरात इंधनाच्या दरात (Fuel Price) तफावत दिसून येते. कच्चा तेलाचे दर 80 डॉलरच्या नीच्चांकी घसरल्यास आणि काही दिवस हे भाव स्थिर राहिल्यास तेल कंपन्यांचा तोटा भरून निघू शकतो.

कच्चा तेलाच्या किंमतीत गेल्या 24 तासात जवळपास 1 डॉलर प्रति बॅरलची घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भावात घसरण झाली. त्याचा भाव 82.44 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. डब्ल्युटीआयचा भाव घसरला. हा भाव 76.14 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला.

काल आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये घसरण नोंदविण्यात आली होती. कालचा दर 83.34 डॉलर प्रति बॅरल होता. डब्ल्युटीआईच्या दरही पडले होते. हा भाव 77.01 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आला होता.  हा भाव अजून कमी झाल्यास कंपन्यांना मोठा फायदा होईल.

हे सुद्धा वाचा

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

आज दिल्लीत पेट्रोल 96.65 रुपये आणि डिझेल 89.82 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.68 तर डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.20 रुपये आणि डिझेल 92.75 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.61 तर डिझेल 94.11 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 107.62 पेट्रोल आणि डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.70 तर डिझेल 93.23 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.32 तर डिझेल 94.78 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.46 आणि डिझेल 92.98 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.07 रुपये आणि डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.69 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.90 आणि डिझेल 93.42 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 106.89 आणि डिझेल 93.37 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.78 रुपये तर डिझेल 93.30 रुपये प्रति लिटर आहे.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....