Petrol, Diesel Prices : कच्च्या तेलाच्या दरात घसरण; इंधनाचे नवे दर जारी, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असून, कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 100 डॉलरच्या आत आले आहेत. तीन आठवड्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते.
Petrol,Diesel Prices : रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध (Russia Ukraine War) सुरूच आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामध्ये युक्रेनचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान रशियाने युद्धबंदीची घोषणा करावी यासाठी अमेरिकेसह युरोपीयन राष्ट्रांनी रशियावर कडक निर्बंध घातले आहेत. रशियामधून कच्च्या तेलाची (Crude Oil) आयात बंद केली आहे. रशियावर घालण्यात आलेल्या निर्बंधांमुळे गेल्या काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार पहायला मिळत आहे. दरम्यान सोमवारी आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कच्च्या तेलाच्या दरात घसरण झाली असून, कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 100 डॉलरच्या आत आले आहेत. तीन आठवड्यापूर्वी कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहोचले होते. ही गेल्या चौदा वर्षातील सर्वात मोठी दरवाढ होती. मात्र आता पुन्हा एकदा कच्च्या तेलाचे दर कमी झाले असून, ते 100 डॉलरच्या आत आले आहेत. एकीकडे अंतरराराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये सातत्याने चढ-उतार सुरू आहे. तर दुसरीकडे भारतातील पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र इंधनाचे दर स्थिर ठेवल्याचे पहायला मिळत आहे. आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या चार नोव्हेंबरपासून देशात पेट्रोल डिझेलचे (Petrol & Diesel) दर स्थिर आहेत.
प्रमुख शहरातील इंधनाचे दर
ओसीएलकडून प्राप्त माहितीनुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रती लिटर 95.41 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 86.67 रुपये एवढा आहे. मुंबत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.98 व 94.14 रुपये एवढा आहे. कोलकातामध्ये एक लिटर पेट्रलसाठी 104.67 रुपये आणि डिझेलसाठी 89.79 रुपये आकारले जात आहेत. तर चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलचा दर 101.40 रुपये तर डिझेलचा दर 91.43 रुपये एवढा आहे.
गेल्या चार नोव्हेंबरपासून देशात इंधनाचे दर स्थिर
चार नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल डिझेलवरील सरचार्ज कमी करण्याचा निर्णय घेतल्याने भारतात पेट्रोल प्रति लिटर मागे पाच रुपयांनी तर डिझेल प्रति लिटर मागे दहा रुपयांनी स्वस्त झाले होते. तेव्हा कच्च्या तेलाचे भाव देखील कमी होते. मात्र तेव्हापासून ते आतापर्यंत पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये कोणताही बदल करण्यात आला नसून, इंधनाच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडे कच्च्या तेलाचे दर वाढल्याने त्याचा दबाव हा पेट्रोलियम कंपन्यावर आल्याचे दिसून येत आहे.
संबंधित बातम्या
धमाकेदार ऑफर! साडेचार लाखांची Datsun कार अवघ्या 2.70 लाखात घरी न्या
EPF आणि PPF मध्ये नेमका काय फरक? दोघांपैकी जास्त Returns कशावर? जाणून घ्या!