Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Petrol-Diesel Price : कच्चा तेलात पडझड, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?

Petrol-Diesel Price : कच्चा तेलात झाली पडझड, तुमच्या शहरातील आज पेट्रोल-डिझेलचा भाव आहे तरी काय

Petrol-Diesel Price : कच्चा तेलात पडझड, तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव काय?
आजचा दर काय
Follow us
| Updated on: Jan 30, 2023 | 8:32 AM

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या भावात (Crude Oil Price) घसरण कायम आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत पडझड झाल्याने भारतात पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होण्याची शक्यता आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज सकाळी पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत. काही शहरात पेट्रोल-डिझेलच्या भावात तफावत आहे. त्यात स्थानिक करासह इतर करांचा समावेश केल्यानंतर भावात तफावत दिसून येते. सध्या सरकारी तेल कंपन्यांना पेट्रोल विक्रीवर जवळपास 5 रुपये प्रति लिटरचा फायदा होत आहे. तर डिझेलच्या विक्रीवर जवळपास 13 रुपये प्रति लिटरचा तोटा होत आहे. जर क्रूड ऑईलच्या किंमती कमी राहिल्या तर कंपन्यांचा तोटा भरुन निघण्यास मदत होईल.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीत फरक दिसून येत आहे. कच्चा तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. कच्चा तेलाचे भाव 88 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. आज आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर 87.35 डॉलर प्रति बॅरलवर व्यापार करत आहेत. ब्रेंट क्रूड 80.37 डॉलर प्रति बॅरल भावावर मिळत आहे.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

हे सुद्धा वाचा

आज दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर आहे. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 106.03 रुपये तर डिझेलचा भाव 92.76 रुपये प्रति लिटर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटरवर पोहचले आहे.

अहमदनगर पेट्रोल 106.85 तर डिझेल 93.33 रुपये प्रति लिटर, अकोल्यात पेट्रोल 106.37 रुपये आणि डिझेल 92.91 रुपये प्रति लिटर, अमरावतीत 107.44 तर डिझेल 93.94 रुपये प्रति लिटर, औरंगाबाद 106.42 पेट्रोल आणि डिझेल 92.93 रुपये प्रति लिटर, नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर, नांदेडमध्ये पेट्रोल 108.50 तर डिझेल 94.96 रुपये प्रति लिटर आहे.

जळगावमध्ये पेट्रोल 106.42 आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर, नाशिकमध्ये पेट्रोल 106.72 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर, लातूरमध्ये पेट्रोल 107.25 तर डिझेल 93.74 रुपये प्रति लिटर, कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.47 आणि डिझेल 93.01 रुपये प्रति लिटर, पुण्यात पेट्रोलचा भाव 105.85 आणि डिझेल 92.37 रुपये प्रति लिटर, सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.77 रुपये तर डिझेल 93.29 रुपये प्रति लिटर आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्...
वाह.. फरफटत नेले, हल्ला केला तरीही 'ती' भिडली चोरट्यांना अन्....
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल
दानवेंच्या नावाचं गार्‍हाणं घेऊन खैरे मातोश्रीवर दाखल.
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्
मुंडेंची सर्व कुंडली कराडकडे..., करूणा शर्मांकडून एन्काऊंटरची भीती अन्.
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.