Today Petrol Price : खिशावरचा भार झाला का हलका? एक लिटर पेट्रोलचा भाव काय

Today Petrol Price : पेट्रोल-डिझेल आता कधी होणार स्वस्त? गेल्या पंधरा दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमती घसरलेल्या आहेत. मग अच्छे दिन येणार तरी कधी?

Today Petrol Price : खिशावरचा भार झाला का हलका? एक लिटर पेट्रोलचा भाव काय
आजचा दर किती
Follow us
| Updated on: Feb 07, 2023 | 8:39 AM

नवी दिल्ली : भारतीय वाहनधारकाला पेट्रोल-डिझेल स्वस्तात मिळत नसल्याने तोही इतर पर्यायांकडे वळला आहे. त्यानेही इलेक्ट्रिक व्हेईकलची वाट धरली आहे. पण तरीही वाहनधारकांना पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol Diesel Price) कमी होतील अशी आशा आहे. आता ही आशा भाबडी आहे की, केंद्र सरकार आश्वासनाप्रमाणे खरेच इंधन दराबाबत दिलासा देतील हे लवकरच कळेल. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून कच्चा तेलाने (Crude Oil Price) मान टाकली आहे. कच्चा तेलाच्या किंमती सातत्याने घसरत आहे. गेल्या काही दिवसांपासून किंमती 80 डॉलर प्रति बॅरलच्या आतबाहेर खेळत आहे. त्यामुळे भारतीय तेल विपणन कंपन्यांचा (OMCs) मोठा तोटा भरून निघाला असणार, हे सांगायला आता ज्योतिषाची गरज थोडीच आहे. तेल विपणन कंपन्या भविष्यात किंमती वाढतील अथवा कमी होतील, या अंदाजानेच पूर्वीच कमी किंमतींना सौदा करतात. विक्री, व्यवस्थापन आणि विपणनाचे हे कौशल्य वापरुनच कंपन्यांना फायदा होतो. आता काही दिवसांत पेट्रोल-डिझेलचे भाव कमी होतील अशी आशा आहे .

आंतरराष्ट्रीय बाजारात सातत्याने कच्चा तेलात घसरण होत आहे. आज या किंमतीत अगदी किंचित वाढ झाली आहे. पण गेल्या आठवडाभरात किंमती कमालीच्या घसरल्या आहेत. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil Price) 74.54 डॉलर प्रति बॅरलवर आहे. तर ब्रेंट क्रूड ऑईलचा (Brent Crude Oil) भाव 81.40 डॉलर प्रति बॅरलवर आहे.

केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

हे सुद्धा वाचा

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

  1. आज मंगळवारी महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही.
  2. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर
  3. अहमदनगर पेट्रोल 106.51 तर डिझेल 93.02 रुपये प्रति लिटर
  4. अकोल्यात पेट्रोल 106.66 रुपये आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  5. अमरावतीत 107.50 तर डिझेल 93.99 रुपये प्रति लिटर
  6. औरंगाबाद 107.85 पेट्रोल आणि डिझेल 94.31 रुपये प्रति लिटर
  7. नागपूरमध्ये पेट्रोल 106.14 तर डिझेल 92.69 रुपये प्रति लिटर
  8. नांदेडमध्ये पेट्रोल 108.08 तर डिझेल 94.56 रुपये प्रति लिटर
  9. जळगावमध्ये पेट्रोल 107.56 आणि डिझेल 94.05 रुपये प्रति लिटर
  10. नाशिकमध्ये पेट्रोल 106.43 रुपये आणि डिझेल 92.94 रुपये प्रति लिटर
  11. लातूरमध्ये पेट्रोल 107.38 तर डिझेल 93.87 रुपये प्रति लिटर
  12. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.91 आणि डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर
  13. पुण्यात पेट्रोलचा भाव 106.70 आणि डिझेल 93.19 रुपये प्रति लिटर
  14. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर

Non Stop LIVE Update
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.