Today Petrol Price : स्वस्तात कच्चे तेल खरेदीचा UAE प्लॅन! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?

Today Petrol Price : भारताने रशियाकडून कच्चे तेल खरेदीसाठी खुष्कीचा मार्ग काढला आहे. भारतीय तेल कंपन्या आणि खासगी कंपन्यांच्या या आयडियाच्या कल्पनेची सध्या चर्चा सुरु आहे. त्यामुळे भारतातील पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर काय परिणाम होऊ शकतो?

Today Petrol Price : स्वस्तात कच्चे तेल खरेदीचा UAE प्लॅन! पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
आजचा भाव काय
Follow us
| Updated on: Feb 09, 2023 | 8:33 AM

नवी दिल्ली : तर मित्रांनो, देशात पेट्रोल-डिझेलची (Petrol-Diesel) टंचाई निर्माण होऊ नये. आपल्या शेजारील देशासारखी परिस्थिती ओढावू नये यासाठी केंद्र सरकारने आयडियाची कल्पना लढवली, हे तर आपल्याला माहितीच आहे. अमेरिका आणि पश्चिमी राष्ट्रांनी रशियावर प्रतिबंध लादले आहेत. रशियाच्या मुसक्या आवळण्यासाठी सर्वच देशांवर दबाव आहे. पण भारताने हा दबाव झुगारुन रशियाकडून गेल्या वर्षी फेब्रुवारीपासून कच्चा तेलाची आयात वाढवली आहे. विशेष म्हणजे त्यासाठी भारताने डॉलरचा वापर ही कमी करुन रुपया-रुबलचा (Rupees-Ruble) पर्याय समोर आणला आहे. आता यापुढे पाऊल टाकत तेल विपणन कंपन्यांनी खुष्कीचा मार्ग शोधला आहे. स्वस्तात कच्चे तेल खरेदीसाठी UAE प्लॅन आखला आहे. त्यामुळे कंपन्यांना रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल (Crude Oil Price) मिळत आहे. त्यामुळे देशात इंधनाचे दर स्थिर आहेत. पण पेट्रोल-डिझेल अजून स्वस्त व्हावेत ही जनतेची अपेक्षा आहे.

तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा UAE प्लॅन आहे तरी काय? तर तेल कंपन्यांनी पश्चिमी राष्ट्रांना चकमा देण्यासाठी संयुक्त अरब अमिरातच्या दिरहम या चलनाचा वापर केला आहे. एका वृत्तानुसार, रिलायन्स इंडस्ट्रीज, नायरा एनर्जी आणि बीपीसीएल या तेल कंपन्यांनी रशियाकडून तेल खरेदी करताना रुपयासोबतच दिरहमचाही वापर सुरु केला आहे. त्यामुळे त्यांना स्वस्तात कच्चे तेल मिळत आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर भारतीय कंपन्या डॉलर ऐवजी रुपयाला प्रोत्साहन देत असल्या तरी अजूनही अनेक सौदे डॉलरमध्येच होत आहे. दरम्यान केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी चेन्नई येथे पत्रकार परिषदेत याविषयीचे स्पष्टीकरण दिले. त्यानुसार, भारतीय कंपन्यांनी दिरहमचा वापर सुरु केल्याबद्दल त्यांनी कानावर हात ठेवले. आपल्याला याविषयात काहीच माहिती नसल्याचे ते म्हणाले. तर रिलायन्स, नायरा आणि बीपीसीएल या कंपन्यांनी ही याविषयीच्या वृत्तावर प्रतिक्रिया दिली नाही .

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारने 21 मे 2022 रोजी पेट्रोल-डिझेलच्या किंमती आटोक्यात आणण्यासाठी इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यानंतर देशात पेट्रोल 8 रुपये तर डिझेल 6 रुपयांनी स्वस्त झाले होते.

तेल विपणन कंपन्या भारतात सकाळी 6 वाजता दर जाहीर करतात. त्याआधारे देशात विविध भागात राज्याचा कर, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कर, पंपधारकांचे कमिशन यामुळे किंमतीत फरक दिसतो. त्याआधारे देशातील विविध शहरातील इंधनाच्या दरात तफावत दिसते.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक पाठवल्यास त्याला आजचे नवीन दर कळतील. त्यासाठी पेट्रोल पंपावर जायची गरज नाही.

तर बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात. त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा. त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल. एचपीसीएल ग्राहकांना HPPrice असे लिहून 9222201122 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.