Petrol Diesel Rate Today : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचा भाव वाढला आहे. तर या ठिकाणी इंधनाचा दर कमी आहे. गेल्या वर्षभरापासून भारतीय नागरिकांना वाढीव दरानेच इंधन खरेदी करावे लागत असले तरी स्थानिक कर आणि इतर शुल्कामुळे भावात तफावत दिसून येते.
Ad
आजचा भाव काय
Follow us on
नवी दिल्ली : केंद्र सरकार गेल्या सहा महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किंमतीबाबत सातत्याने राँग नंबर डायल करायला लावत आहे. जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव आपटले आहेत. रशियाकडून स्वस्तात क्रूड ऑईल (Crude Oil Price) खरेदी सुरु आहे. तेल कंपन्या युरोपियन राष्ट्रांमध्ये त्याची विक्री करुन नफा कमावत आहे. पण भारतीय नागरिकांना गेल्या वर्षभरापासून चढ्या दरानेच पेट्रोल-डिझेल खरेदी करावे लागत आहे. स्थानिक कर आणि इतर शुल्कामुळे भावात तफावत दिसून येते. राज्यातील अनेक शहरात आज पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) महागले आहे. तुमच्या शहरातील भाव एका एसएमएसवर तुम्हाला जाणून घेता येईल.
कच्चे तेल घसरले
मार्च 2022 मध्ये क्रूड ऑईल महागले होते. किंमती प्रति बॅरल 140 डॉलरवर पोहचल्या होत्या. गेल्या सहा महिन्यांपासून कच्चे तेल दणकावून आपटले आहे. किंमती तेव्हापासून 80 डॉलर प्रति बॅरलच्या आत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी सकाळीच 6 वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जाहीर केले आहेत.
आज हा भाव
जागतिक बाजारात कच्चे तेल घसरणीवरच आहे. 27 जून रोजी ब्रेंट क्रूड ऑईल 74.15 डॉलर प्रति बॅरलवर पोहचले होते. तर डब्ल्यूटीआय क्रूड ऑईलचा भाव 69.38 डॉलर प्रति बॅरल झाला होता. या किंमती घसरणीवर आहेत.