टंचाईचा पेट्रोल-डिझेल दरावर काय झाला परिणाम? काय आहेत तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर? भाव वाढले की कमी झाले? चला जाणून घेऊयात
Petrol-Diesel Rate Today: ऑईल कंपन्यांनी आजच्या दिवसाचे पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती घसरल्याने इंधन स्वस्त झाले. सध्या इंधनाचे दर 113 डॉलरवर घसरले आहेत.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरण झाली आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील घडामोडींचा हा परिपाक आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीत जवळपास 8 टक्क्यांची घसरण झाली आहे. सध्या इंधनाचे दर 113 डॉलरवर घसरले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. गेल्या 30 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे दर यापूर्वी वाढत होते. परंतू दोन दिवसांत कच्चे तेलाचे दर घसरले आहेत. वाढीव दराने इंधन खरेदी करुन ते कमी दराने विक्री केल्याने पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) त्याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसला आहे. परिणामी इंडियन ऑईल सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड दिसून आली. पेट्रोलियम कंपन्यांचे (Petroleum Companies) शेअर गेल्या 52 दिवसांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत असल्याचा दावा पेट्रोलियम कंपन्यांनी केला आहे. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्यांकडून उत्पादन कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर झाला असून, देशात पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. देशातील अनेक शहरांना पेट्रोल टंचाईचा सामना करावा लागला आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील दर
शहरं | पेट्रोल | डिझेल |
---|---|---|
मुंबई | 111.35 | 97.28 |
पुणे | 111. 30 | 98 |
नाशिक | 111.25 | 95.73 |
नागपूर | 111.41 | 95.73 |
कोल्हापूर | 111.02 | 95.54 |
प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर
पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकतामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेल भाव 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास आज सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईमध्ये असून, सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये मिळत आहे.
पेट्रोल टंचाई सर्वसामान्यांना फटका
पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलपंप चालकांना पुरेशाप्रमाणात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होत नसल्याने सध्या अनेक पेट्रोलपंप हे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा सर्वाधिक फटका हा मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना बसत आहे. पेट्रल, डिझेल अभावी हजारो पेट्रोलपंप बंद आहेत. कच्चा तेलाच्या दरात वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी उत्पादन कमी केले आहे. याचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.