Today’s petrol, diesel rates : पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार?, देशात इंधन टंचाई; जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे भाव

| Updated on: Jun 19, 2022 | 6:59 AM

पेट्रोलियम कंपन्यांनी पुरवठा कमी केल्याने देशभरात पेट्रोल, डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. इंधन नसल्याने देशभरातील हजारो पेट्रोलपंप बंद आहेत. कच्च्या तेलाचे दर वाढत असल्याने त्याचा मोठा फटका पेट्रोलियम कंपन्यांना बसतोय.

Todays petrol, diesel rates : पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार?, देशात इंधन टंचाई; जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे भाव
आजचे पेट्रोल, डिझेल रेट
Follow us on

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलचे दर (Petrol-Diesel Price) स्थिर आहेत. एकीकडे कच्च्या तेलाच्या दरात वाढ सुरूच आहे. तर दुसरीकडे गेल्या 29 दिवसांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कच्च्या तेलाचे दर वाढत आहेत, परंतु पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) भाव स्थिर असल्याने याचा मोठा फटका हा पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. परिणामी इंडियन ऑईल सारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी पडझड दिसून येत आहे. पेट्रोलियम कंपन्यांचे शेअर गेल्या 52 दिवसांच्या निचांकी पातळीवर पोहोचले आहेत. पेट्रोलियम कंपन्यांचे दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. त्यामुळे आता पेट्रोलियम कंपन्यांकडून उत्पादन कमी करण्यात आले आहे. त्याचा परिणाम पेट्रोल, डिझेलच्या पुरवठ्यावर झाला असून, देशात पेट्रोल, डिझेलची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक पेट्रोलपंप पेट्रोल नसल्याने बंद आहेत.

राज्याच्या प्रमुख शहरातील दर

शहरंपेट्रोलडिझेल
मुंबई111.3597.28
पुणे111. 3098
नाशिक111.2595.73
नागपूर111.4195.73
कोल्हापूर111.0295.54

प्रमुख महानगरातील पेट्रोल, डिझेलचे दर

पेट्रोलियम कंपन्यांकडून जारी करण्यात आलेल्या नव्या दरानुसार आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 96.72 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 89.62 रुपये इतका आहे. मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 111.35 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 97.28 रुपये इतका आहे. चेन्नईमध्ये पेट्रलचा दर प्रति लिटर 102.63 रुपये तर डिझेलचा भाव प्रति लिटर 94.24 रुपये इतका आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 106.03 रुपये तर डिझेल भाव 92.76 रुपये इतका आहे. महानगरातील पेट्रोल, डिझेलच्या भावाची तुलना करायची झाल्यास आज सर्वाधिक महाग पेट्रोल मुंबईमध्ये असून, सर्वात स्वस्त पेट्रोल दिल्लीमध्ये मिळत आहे.

हे सुद्धा वाचा

देशात पेट्रोल टंचाई

पेट्रोलियम कंपन्यांकडून पेट्रोलपंप चालकांना पुरेशाप्रमाणात पेट्रोल, डिझेलचा पुरवठा होत नसल्याने सध्या अनेक पेट्रोलपंप हे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. याचा सर्वाधिक फटका हा मध्य प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या राज्यांना बसत आहे. पेट्रल, डिझेल अभावी हजारो पेट्रोलपंप बंद आहेत. कच्चा तेलाच्या दरात वाढ होत आहे. मात्र दुसरीकडे देशात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर असल्याने पेट्रोलियम कंपन्यांनी तोटा कमी करण्यासाठी उत्पादन कमी केले आहे. याचा मोठा फटका आता देशभरात बसू लागला आहे.