Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Today Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

आज देखील इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. राज्यात पेट्रोल, डिझेलच्या किमती स्थिर असून, सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Today Petrol, Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 29, 2022 | 6:42 AM

मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol and Diesel) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 24 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर टॅक्स कमी करण्याच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Delhi Today) प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Mumbai Today) 120.51 रुपये असून, डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या सहा एप्रिलनंतर कोणतीही दरवाढ करण्यात आली नसून, राज्यांनी इंधनावरील टॅक्स कमी करावा असे आवाहन केंद्रांच्या वतीने राज्यांना करण्यात येत आहे.

राज्यांच्या प्रमुख शहरातील भाव

  1. आज सलग 24 दिवस झाले पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. आज जाहीर करण्यात आलेल्या दरानुसार मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये आहे तर डिझेलचा दर 104.77 रुपये प्रति लीटर आहे.
  2. पुण्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.20 रुपये तर डिझेलचा दर 103.10 रुपये एवढा आहे.
  3. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 120.40 रुपये असून, एका लिटर डिझेलसाठी 103.73 रुपये मोजावे लागत आहेत.
  4. परभणीमध्ये पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 123.51 आणि 106.10 रुपये लिटर आहे.
  5. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा दर 121.13 रुपये आहे तर डिझेलचा दर 103.79 रुपये आहे.
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.