मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल, डिझेलच्या दरात (Petrol and Diesel) कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सलग 24 दिवसांपासून इंधनाचे दर स्थिर आहेत. तर दुसरीकडे पेट्रोल, डिझेलवर टॅक्स कमी करण्याच्या मुद्द्यावरून आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आमने-सामने आल्याचे पहायला मिळत आहे. आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या नव्या दरानुसार आज राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Delhi Today) प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेलचा दर 96.67 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर (Petrol Price in Mumbai Today) 120.51 रुपये असून, डिझेल 104.77 रुपये प्रति लीटर आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरात गेल्या सहा एप्रिलनंतर कोणतीही दरवाढ करण्यात आली नसून, राज्यांनी इंधनावरील टॅक्स कमी करावा असे आवाहन केंद्रांच्या वतीने राज्यांना करण्यात येत आहे.