Today Petrol Diesel Price : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
राज्यात आज देखील इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले असून, पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जाणून घ्या आपल्या शहरातील भाव
मुंबई : पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर (Petrol Diesel Price) जारी करण्यात आले आहेत. नव्या दरानुसार आज देखील पेट्रोल (Petrol), डिझेलचे (Diesel) दर स्थिर असून, त्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या एक महिन्यांपासून देशासह राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. विशेष म्हणजे या कालवधीत कच्च्या तेलाच्या दरामध्ये मोठी चढ -उतार पहायला मिळत आहे. मात्र असे असताना देखीस भारतात इंधनाचे दर स्थिर ठेवण्यात आले आहेत. बावीस मार्च ते सहा एप्रिल या कालावधीत पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी भाववाढ पहायला मिळाली होती. पेट्रोल,. डिझेलच्या दरात प्रति लिटर दहा रुपयांपेक्षाही अधिक वाढ झाली. मात्र सहा एप्रिलनंतर पेट्रोल, डिझेलच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या आजच्या दरानुसार राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल 96.67 रुपये लिटर आहे. तर मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये लिटर असून, डिझेल 104.77 रुपये लिटर आहे.
राज्याच्या प्रमुख शहरातील भाव
आज राज्यात पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 104.77 रुपये आहे. पुण्यात पेट्रोल, डिझेलचा दर अनुक्रमे 120.20 आणि 104. 50 रुपये प्रति लिटर इतका आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलचा दर प्रति लिटर 120.40 आहे तर डिझेलचा दर 103.73 रुपये इतका आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलचा भाव प्रति लिटर 121.30 रुपये लिटर असून, डिझेल 104. 50 रुपये प्रति लिटर आहे. परभणीत पेट्रोलचा दर प्रति लिटर 123.51 रुपये तर डिझेलचा दर प्रति लिटर 106 रुपये इतका आहे. सध्या राज्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आणि डिझेल परभणीमध्ये आहे.
इतर इंधनाच्या किमती वाढल्या
दरम्यान राज्यात सध्या पेट्रोल, डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र इतर इंधनाच्या किमती वाढताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसच्या सिलिंडरमध्ये प्रति सिलिंडर 50 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दुसरीकडे एक मे रोजी व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात देखील वाढ करण्यात आली होती. सीएनजी, पीएनजीच्या दरांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहेत. जेट फ्यूल देखील महाग झाले आहे.