Multibagger Stock : पेट्रोलियम स्टॉकवर सर्वच फिदा, असा जोरदार दिला परतावा

Multibagger Stock : तर या पेट्रोकेमिकल्स क्षेत्राताली स्टॉकने गुंतवणूकदारांना छप्परफाड कमाई करुन दिली. ज्यांनी पूर्वीच गुंतवणूक केली त्यांना आता कमाईची संधी मिळाली आहे. या शेअरमध्ये 6.47% तेजी दिसून आली आहे. बीएसईवर हा शेअर 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 103.40 रुपये प्रति शेअरवर पोहचला आहे. हा शेअर मोठी झेप घेण्याची शक्यता आहे.

Multibagger Stock : पेट्रोलियम स्टॉकवर सर्वच फिदा, असा जोरदार दिला परतावा
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 2:09 PM

नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : बुधवार शेअर बाजाराला (Share Market) पावला नाही. बाजारात मोठी घसरण झाली. दुपारपर्यंत बीएसई सेन्सेक्स 0.81 टक्के म्हणजे 530 अंकांनी घसरुन 64,981 अंकावर आला तर एनएसई निफ्टीत 158 अंकांची घसरण होऊन तो 19,370 वर व्यवहार करत होता. शेअर बाजारात घसरणीचे सत्र असले तरी या स्टॉकने गुंतवणूकदारांसह (Investors) बाजारातील तज्ज्ञांचे लक्ष वेधले. हा शेअर त्याचे पुढील लक्ष्य गाठणार याचा अंदाज तज्ज्ञांना आला आहे. या शेअरमध्ये आज 6.47% तेजी आली. बीएसईवर पण त्याने कमाल केली. हा शेअर 103.40 रुपयांवर पोहचला. त्याने 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला.

या कंपनीची कमाल

शेअर बाजारात मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल्स लिमिटेडच्या (MRPL) शेअरने ही कमाल केली. हा शेअर 6.47 टक्क्यांसह वधारला. या शेअरने नवीन उच्चांक गाठला. या शेअरची व्हॅल्यूम सर्वसाधारणपणे 4.36 पटीने वाढला. MRPL चे सध्याचे बाजारातील भांडवल 17,666.20 कोटी रुपये आहे.

हे सुद्धा वाचा

टेक्निकल चार्ट पाहिला का?

टेक्निकल चार्टनुसार हा शेअर 4 ऑक्टोबर 2023 रोजीपर्यंत, 200 दिवसांचा मुव्हिंग एव्हरेज (DMA) 75.18 रुपयांवर होता. तर 50-DMA 90.42 रुपये होता. बीएसईवर कंपनीचे सध्याचे शेअर मूल्य 101.20 रुपये आहे. 50-DMA, 200-DMA पेक्षा तो वधारला आहे. त्यामुळे या कंपनीची घौडदोड कायम राहिल. हा शेअर भविष्यात आगेकूच करेल, असा अंदाज आहे.

काय करते कंपनी

मंगलोर रिफायनरी आणि पेट्रोलकेमिकल्स लिमिटेड (MRPL) ही मुळात एक संयुक्त उपक्रम (Joint Ventures) आहे. बिर्ला समहू आणि हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांचा हा संयुक्त उद्योग आहे. ही कंपनी ओएनजीसीची (ONGC) सहाय्यक कंपनी आहे. कंपनीचे मुख्य कार्य कच्चा तेलाचा शोध घेणे, पेट्रोकेमिकल्स, विमानाच्या इंधनाचा व्यापार आणि रिटेल आऊटलेटसह इतर पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन करणे आणि त्यांचे वितरण करणे हा आहे. हा शेअर गेल्या तीन वर्षांत 283% वधारला आहे. या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर रिटर्न दिला आहे.

सूचना : हा शेअरचा केवळ लेखाजोखा आहे. या शेअरची कामगिरी आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्ही प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराकडून सल्ला आवश्य घ्या. तुमचा कोणत्या ही प्रकारचा फायदा अथवा नुकसानीला TV9 मराठी जबाबदार नसेल.

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.