Cyber Fraud : खात्यातून चोरी झालेली रक्कम ही मिळविता येते परत? पण वेळीच करावी लागते ही धावपळ..
Cyber Fraud : तुमच्या खात्यातील चोरी गेलेली रक्कम ही परत मिळू शकते, पण त्यासाठी या गोष्टी तातडीने कराव्या लागतील..
नवी दिल्ली : तुमच्या खात्यातूनही सायबर भामट्यांनी (Cyber Fraud) रक्कम लाबंवली आहे का? तातडीने तुम्ही जर पावलं उचलली तर तुम्ही ही रक्कम (Amount) परत ही मिळवू शकता. पण त्यासाठी काय करावे लागेल हे तुम्हाला माहिती आहे का? तर समजून घेऊयात या काय प्रक्रिया करावी लागते ते.
आमिषाचे, ऑफरच्या नावाखाली मोठ्या फायद्याचे आमिष दाखविले जाते. त्यातून लोक फिशिंग अटॅकचे शिकार होतात. या लोकांचे बँक खाते झटकन खाली होते. त्यांच्या खात्यातील शिल्लक भामटे साफ करुन टाकतात.
रिझर्व्ह बँकेच्या नावानेही सर्वसामान्य बँक खातेदारांना फसविण्यात येते. वास्तविक रिझर्व्ह बँक थेट ग्राहकांना कोणत्याही ऑफरविषयीचा एसएमएस पाठवत नाही. तुमच्या फायद्यासाठी केंद्रीय बँक कोणताही मॅसेज पाठवित नाही.
तसेच म्युच्युअल फंडात फायद्याचे गणित थोपवत आपल्याला सायबर भामटे जाळ्यात ओढतात. एकादा तुमचा तपशील हाती आला की फिशिंगद्वारे तुमचे खाते हॅक करुन रक्कम काढून घेण्यात येते.
त्यामुळे ऑफरच्या कोणत्याही आमिषाला बळी पडून कोणत्या लिंकवर क्लिक करु नका. त्यामुळे बँकिंग फ्रॉडचे ते शिकार होऊ शकता. एकदा पैसा खात्यातून गेल्यावर तो मिळवण्यासाठी मोठी अडचण येते. पण तो मिळविताच येत नाही असे नाही. योग्यवेळी प्रक्रिया केल्यास तुमचा पैसा परत मिळविता येऊ शकतो.
खात्यातून गायब झालेला पैसा परत मिळू शकतात. अटी आणि नियमांचे पालन करुन तुम्हाला ही रक्कम मिळविता येईल.
यामधील पहिला नियम म्हणजे ही माहिती त्वरीत पोलिसांना देणे गरजेचे आहे. तसेच बँकेलाही याविषयीची माहिती देणे आवश्यक आहे.
दुसरा नियम म्हणजे तुम्ही एखाद्या सायबर फ्रॉडच्या चक्रात अडकला आणि तुमच्या खात्यातील रक्कम गायब झाली तर बँकेच्या अधिकाऱ्यांना याची माहिती द्यावी. त्यासाठी काहीही खोटं बोलण्याची गरज नाही. फसवणूक कशी झाली याची माहिती द्यावी.
तुमच्या तक्रारीवर बँक अधिकारी पुढील प्रक्रिया करतील. तुम्ही तक्रार करण्यास जेवढा उशीर केला, तेवढ्या अडचणी वाढतील. तसेच तेवढे तुमचे नुकसानही वाढेल.
बँकेकडे तक्रार केल्यानंतर तुमचा तक्रार क्रमांक विचारुन घ्या. त्याची तुमच्याकडे नोंद करुन घ्या. एकादा तुम्ही बँकेकडे तक्रार केल्यानंतर बँकेला 90 दिवसांत तुमच्या तक्रारीचा निपटारा करावा लागतो.