PhonePe टर्म लाईफ इन्शुरन्स लाँच, 149 रुपयात लाखोंचा फायदा, तुम्ही पात्र आहात?
भारतातील लोकप्रिय डिजीटल पेमेंट्स अॅप फोन पे आता टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेऊन येत आहे. (Phone Pe Term Plan)
नवी दिल्ली: भारतातील लोकप्रिय डिजीटल पेमेंट्स अॅप फोन पे आता टर्म लाईफ इन्शुरन्स प्लॅन घेऊन येत आहे. फोन पे ने यासाठी आयसीआयसीआय प्रोड्युन्शिअल लाईफ इन्शुरन्स सोबत करार केला आहे. दोन्ही कंपन्यानी एकत्र येत नवीन टर्म इन्शुरन्स प्लॅन जाहीर केला आहे. यामुळे फोन पेच्या लाखो युजर्सना याचा फायदा होणार आहे. फोन पेकडून जारी करण्यात आलेल्या टर्म प्लॅनचा प्रीमियमची रक्कम वार्षिक 149 रुपयांपासून सुरु होते. हा टर्म प्लॅन खरेदी करण्यासाठी कोणत्याही प्रकारची आरोग्य चाचणी किंवा कागदपत्रांची तपासणी करावी लागणार नाही. फोन पेच्या अॅपवर हा टर्म प्लॅन खरेदी करता येईल. (Phone Pe launches term plans starting one hundred fifty nine rupees know about plan)
फोन पे ग्राहकांना या टर्म प्लॅनमध्ये 1 लाख ते 20 लाख रुपयांपर्यतच्या रक्कमेसाठी प्रीमियम निवडता येईल. त्यानुसार प्रीमियमची रक्कम बदलेल. 149 रुपयांमध्ये टर्म इन्शुरन्स प्लॅन उपलब्ध झाल्यामुळे फोन पेच्या लाखो वापरकर्त्यांना याचा लाभ घेता येईल. हा एक टर्म इन्शुरन्स प्लॅन असून मॅच्युरिटीनंतर पॉलिसीधारकाला कोणतीही रक्कम मिळणार नाही. पॉलिसीच्या कालावधीमध्ये विमा घेतलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना(वारसदारांना) विमा रक्कम दिली जाणार आहे.
टर्म इन्शुरन्स कोण घेऊ शकते?
फोन पे अॅप वापरणारा कोणीही 18 ते 50 वर्ष वयापर्यंतची व्यक्ती ज्याचं उत्पन्न 1 लाखांहून अधिक असेल तो या प्लॅनचा लाभ घेऊ शकतो. हा प्लॅन फोन पे अॅपच्या इन्शुरन्स ऑप्शनमध्ये जाऊन खेरदी करता येईल. टर्म इन्शुरन्स प्लॅनमध्ये ग्राहकाला 1 लाखांपासून 20 लाखांपर्यतच्या रक्कमच्या प्रमाणात प्रीमियम भरावा लागेल.
फोन पेचा वापर करणाऱ्या 1 कोटी 10 लाख वापरकर्त्यांनी 2020 मध्ये विम्याचे हप्ते भरले होते. फोन पेसोबत सध्या 30 विमा कंपन्या जोडलेल्या आहेत. या कंपन्यांच्या विम्याचे हप्ते फोन पेवरुन भरले जातात.
टर्म इन्शुरन्स प्लॅन कसा खरेदी करणार
फोन पे अॅप वापरणाऱ्यांना त्यांच्या अॅपमधून हा टर्म इन्शुरन्स प्लॅन खरेदी करता येईल. एपमध्ये फोन पे वरील ‘My Money’ सेक्शनवर जावं लागेल. त्यानंतर Insurance वर क्लिक करावं लागेल. यानंतर Term Life Insurance ची निवड करणं आवश्यक आहे. यानंतर विमाधारक व्यक्ती आणि वारसदाराची माहिती भरावी लागेल. त्यानंतर युजर्स ऑनलाईन पेमेंटद्वारे ही पॉलिसी खरेदी करु शकतात. प्लॅन खरेदी करण्यापूर्वी कंपनीनं दिलेल्या अटी शर्थी काळजीपूर्वक वाचाव्यात किंवा तज्ज्ञांचा सल्ला घ्या.
संबंधित बातम्या:
नव्या वर्षात स्वस्तात खरेदी करा स्वप्नातलं घर, PNB तब्बल 3100 घरांचा करतेय लिलाव
लखपती व्हायचंय… मग मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा
(Phone Pe launches term plans starting one hundred fifty nine rupees know about plan)