सावधान, तुम्हालाही RBI गव्हर्नरच्या नावाने मेल आलाय का? ‘असं’ आहे फसवणुकीचं संपूर्ण प्रकरण
बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात चोरांनीही आपले चोरीचे मार्ग बदलले आहेत. आता त्यांच्याकडून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय.
नवी दिल्ली : बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात चोरांनीही आपले चोरीचे मार्ग बदलले आहेत. आता त्यांच्याकडून सामान्य नागरिकांची फसवणूक करण्यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग होतोय. यात ते आपण एखाद्या बँकेचे अधिकारी असल्याचं सांगत फसवणूक करतानाची अनेक प्रकरणं समोर आलीत. मात्र, आता थेट बारतीय रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांच्या नावाने इमेल पाठवून फसवणूक होत असल्याचा प्रकार उघड झालाय. या मेलमध्ये आर्थिक मदत करण्यात येणार असल्याचं आमिष दाखवून संबंधित वापरकर्त्यांची माहिती मागितली जात आहे (PIB Fact check about Email on the name of RBI Governor and fraud).
मागील काही काळापासून सायबर फ्रॉडच्या प्रकरणांमध्ये वाढ झालीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोट्यावधी लोक आता ऑनलाईन व्यवहारांना प्राधान्य देत आहेत. मात्र, या व्यवहारांची कमी माहिती असलेल्या नागरिकांची फसवणूक करण्याचे प्रयत्न होत असल्याचंही दिसत आहे. म्हणूनच केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण विभागाने (PIB) या खोट्या माहितीबद्दल जनजागृती सुरु केलीय.
आरबीआयच्या नावाने येणाऱ्या फ्रॉड मेलपासून सावध राहा
Emails allegedly from the Governor of RBI claim that the recipient has won monetary compensation and are asking for personal details to redeem the prize.#PIBFactCheck: These emails are #Fake. @RBI neither sends such messages nor uses Gmail accounts for communication. pic.twitter.com/M5rCfJJfl7
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 18, 2021
PIB Fact Check च्या टीमने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिलीय. पीआयबीने म्हटलं आहे, “रिझर्व्ह बँकेकडून कोणत्या प्रकारच्या आर्थिक लाभाची योजना सुरु नाहीये. त्यामुळे आरबीआयच्या नावाने येणाऱ्या फसवणूक करणाऱ्या मेलपासून सावध राहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नागरिकांना कधीही जीमेलचा उपयोग करुन माहिती देत नाही. त्यामुळे अशा मेल किंवा मेसेजपासून सावध राहा. तुम्हाला अशा प्रकारच्या कोणत्याही संशयास्पद माहितीबद्दल काही प्रश्न असेल तर 8799711259 या नंबरवर व्हॉट्सअॅप करुन विचारु शकता.”
कर परतावा (IT refund mail) आमिषाला बळी पडू नका
Emails allegedly from the Governor of RBI claim that the recipient has won monetary compensation and are asking for personal details to redeem the prize.#PIBFactCheck: These emails are #Fake. @RBI neither sends such messages nor uses Gmail accounts for communication. pic.twitter.com/M5rCfJJfl7
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 18, 2021
कॅनरा बँकेने देखील आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ऑनलाईन फ्रॉडविषयी माहिती दिलीय. यात कर परताव्याच्या नावावर फसवले जात असल्याचीही माहिती देण्यात आलीय. तुमची खासगी माहिती मागणाऱ्या मेसेज किंवा मेलपासून सावध राहा असा अलर्ट कॅनरा बँकेने जारी केलाय. अशी माहिती दिल्यास तुमच्या बँक खात्यावरुन तुमचे पैसे चोरले जाऊ शकतात.
हेही वाचा :
150 एटीएममध्ये क्लोनिंग, हजारो ग्राहकांना लुटणाऱ्या आठ जणांच्या टोळीची अखेर मुंबई पोलिसांशी गाठ
सावधान, Jio च्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा इशारा, ‘ही’ चूक करणं टाळाच
एटीएम कार्डचे क्लोनिंग करुन लाखो रुपये हडपणारी टोळी गजाआड, 74 एटीएम कार्डसह क्लोनिंग मशीन जप्त
व्हिडीओ पाहा :
PIB Fact check about Email on the name of RBI Governor and fraud