लखपती व्हायचंय… मग मोदी सरकारच्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर वाढवण्यासाठी PM-KUSUM योजनेचा विस्तार केला होता. | PM KUSUM Scheme

लखपती व्हायचंय... मग मोदी सरकारच्या 'या' योजनेत पैसे गुंतवा
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 8:12 AM

नवी दिल्ली: यंदाच्या वर्षात तुम्ही एखादा व्यवसाय किंवा आर्थिक गुंतवणूक करायच्या विचारात असाल तर मोदी सरकारची (Modi government scheme) एक योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. सरकारी योजना असल्यामुळे या योजनेत फसवणूक होण्याची शक्यता कमी आहे. तसेच तुम्ही झटपट पैसा कमावून श्रीमंतही होऊ शकता.  (Modi government this scheme will be beneficial for you)

केंद्र सरकारकडून पंतप्रधान किसान उर्जा आणि उत्थान महाअभियान अर्थात पीएम-कुसुम (PM-KUSUM) योजना चालवली जाते. या योजनेतंर्गत तुम्ही तुमच्या खडकाळ किंवा नापीक जमिनीवर सौर पॅनल (Solar panel) लावून कमाई करु शकता.

नक्की काय आहे योजना?

गेल्यावर्षीच्या नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात सौरउर्जेचा वापर वाढवण्यासाठी PM-KUSUM योजनेचा विस्तार केला होता. त्यानुसार नापीक, कुरणाच्या जमिनी आणि दलदलीच्या भागातही सौर पॅनल्स उभारण्यास मंजुरी मिळाली होती.

सोलर पॅनल लावण्यासाठी सरकारकडून 90 टक्के कर्ज

PM-KUSUM योजनेतंर्गत सोलर पॅनल्स लावण्यासाठी सरकार 90 टक्के कर्ज देते. तुम्हाला केवळ 10 टक्के भांडवलाची व्यवस्था करावी लागते. तर बँकांकडून शेतकऱ्यांना 30 टक्के रक्कम कर्जाच्या स्वरुपात दिली जाते. तर केंद्र सरकार सोलर पंपासाठी लागणाऱ्या एकूण खर्चाच्या 60 टक्के रक्कम देते.

कमाई कशी होणार?

तुमच्या जमिनीवर सोलर पॅनल्स लावल्यास चांगली कमाई होऊ शकते. सोलर प्लांटमध्ये तयार झालेली वीज विद्युत वितरण कंपनीकडून (DISCOM) खरेदी केली जाईल. त्यामुळे जमिनीच्या मालकाला प्रत्येकवर्षी 60 हजार ते एक लाखांचे उत्पन्न मिळू शकते. मात्र, सोलर पॅनल्स लावण्यासाठी तुमची जमीन विद्युत सब-स्टेशनपासून पाच किलोमीटरच्या अंतरावर पाहिजे.

योजनेसाठी अर्ज कसा कराल?

PM-KUSUM योजनेत सहभागी होण्यासाठी https://mnre.gov.in/ या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी लागेल. याठिकाणी तुम्हाला आधार कार्ड, संपत्तीचा तपशील आणि बँक खात्याची माहिती द्यावी लागेल.

संबंधित बातम्या:

Bank of Baroda च्या खातेदारांसाठी गुडन्यूज, व्हॉट्सअ‌ॅप बँकिंग सर्व्हिस सुरु

Gold Price Today: आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने-चांदी 2000 रुपयांनी महागले; जाणून घ्या आजचा भाव

10 वर्षांपर्यंत मोदी सरकार देणार पेन्शन; ‘या’ योजनेचा कसा घ्याल फायदा?

(Modi government this scheme will be beneficial for you)

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.