UPI Transaction : आता परदेशातही युपीआयचा श्रीगणेशा, या देशात बिनधास्त करा व्यवहार

UPI Transaction : देशभरात ऑनलाईन व्यवहारांना (Online Transaction)चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीआय (UPI) सेवा सुरु केली. तात्काळ रक्कम हस्तांतरीत करण्याची ही पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली. आता परदेशात पण ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या देशात युपीआयचा श्रीगणेशा झाला आहे.

UPI Transaction : आता परदेशातही युपीआयचा श्रीगणेशा, या देशात बिनधास्त करा व्यवहार
Follow us
| Updated on: Feb 21, 2023 | 5:29 PM

नवी दिल्ली : देशभरात ऑनलाईन व्यवहारांना (Online Transaction)चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीआय (UPI) सेवा सुरु केली. तात्काळ रक्कम हस्तांतरीत करण्याची ही पद्धत प्रचंड लोकप्रिय झाली. देशातील लाखो स्मार्टफोनधारक त्याचा वापर करतात. दररोज कोट्यवधींची उलाढाल होते. आता परदेशात पण ही सुविधा उपलब्ध झाली आहे. या देशात युपीआयचा श्रीगणेशा झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युनिफाईड पेमेंट इंटरफेस (UPI) आणि सिंगापूर येथील पे नाऊ (Pay Now) यांनी संयुक्तपणे हा व्यवहार करण्याची सुविधा नागरिकांना दिली आहे. त्यामुळे भारतीय युपीआयचा डंका परदेशातही वाजला आहे. नागरिकांना युपीआयच्या मदतीने सिंगापूरमध्ये पण व्यवहार करता येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युपीआय ही भारतातील सर्वात वेगवान आणि लोकप्रिय व्यवहार प्रणाली असल्याच सांगितले. तज्ज्ञांच्या दाव्याचा आधार घेत, युपीआयमुळे देशात लवकरच रोखीतील व्यवहाराची सवय मोडीत निघेल, असे त्यांनी सांगितले.

मोदी यांनी सिंगापूरचे पंतप्रधान ली सियन लूंग यांच्या उपस्थितीत युपीआय आणि सिंगापूर येथील पे नाऊ या प्रणाली यांच्यातील व्यवहाराची ही प्रक्रिया सुरु करताना युपीआय प्रणालीचे कौडकौतुक तर केलेच पण त्याचे फायदेही सांगितले. भारतात युपीआय प्रणालीने झटपट व्यवहार होत असल्याने त्याचा झपाट्याने वापर वाढला आहे.

हे सुद्धा वाचा

भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास आणि सिंगापूर नाणेनिधी प्राधिकरणाचे संचालक रवी मेनन यांनी ही सुविधा सुरु केली आहे. मोदी यांनी सांगितले की, या नवीन पाऊलामुळे क्रॉस बॉर्डर फिनटेक कनेक्टिव्हिटीचा एक नवीन अध्याय सुरु झाला आहे. आता भारत आणि सिंगापूरमधील नागरिक आपल्या मोबाईलने त्याच प्रमाणे रक्कम हस्तांतरीत करु शकतील, जसे ते त्यांच्या देशात करत आहेत.

या सुविधाचा फायदा प्रवासी भारतीय, विद्यार्थी, व्यावसायिक आणि त्यांच्या कुटुंबियांना प्राधान्याने घेता येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानुसार, 2022 मध्ये देसात युपीआयच्या माध्यमातून 12,6000 अब्ज रुपयांहून अधिक 74 अब्ज व्यवहार झाले आहेत. या वाढत्या व्यवहारांमुळे देशात विकसीत या पेमेंट पद्धतीवर विश्वास असल्याचे दिसून येत असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

केंद्र सरकारने रुपे डेबिट कार्ड आणि भीम-युपीआय व्यवहारांना अधिक गती देण्यासाठी प्रोत्साहन लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एका सामान्य वापारकर्त्यासह व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना मोठा फायदा होणार आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने त्यासाठी एकूण 2,600 कोटी रुपयांची खास तरतूद केली आहे.

योजनेनुसार, बँकांना चालू आर्थिक वर्षांत RuPay आणि UPI चा वापर केल्यास पॉईंट ऑफ सेल (PoS) आणि ई-कॉमर्स व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी इन्सेटिव देण्यात येणार आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या भाषणात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंबंधीची घोषणा केली होती.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.