WITT 2025: 10 वर्षात देशाचा जीडीपी डबल झाला, आता मिशन विकसित भारत : नरेंद्र मोदी
गेल्या दहा वर्षात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे, ज्यामुळे तो जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. IMF च्या अहवालानुसार, 2025 पर्यंत भारताचा जीडीपी 4.27 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. हे यश भारताच्या आर्थिक धोरणांचे आणि वाढत्या युवा लोकसंख्येचे प्रमाण आहे.

आमचं सरकार आलं आणि गेल्या दहा वर्षात भारताचा जीडीपी वाढला. भारत जगातील टॉप 5 अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट झाला. जो भारत 70 वर्षांत जगातील 11 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, तो केवळ 7-8 वर्षांत 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. तसेच भारताचा विकास दर आज जगातील सर्व प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये सर्वात जास्त आहे. भारताला 2047 पर्यंत जगातील विकसित देशांच्या यादीत समाविष्ट करणं हेच आमचं लक्ष्य आहे, असं सांगतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवरही नाव न घेता हल्ला चढवला.
टीव्ही9 नेटवर्कने नवी दिल्लीत व्हाट इंडिया थिंक्स टुडे या समीटचं आयोजन केलं होतं. या समिटला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा रोडमॅपच मांडला. 2025 च्या अखेरपर्यंत भारताची जीडीपी 4 ट्रिलियन डॉलरपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. पुढील काही वर्षांत भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे. याचे समर्थन IMF, वर्ल्ड बँक आणि इतर अनेक वित्तीय संस्थांसह रेटिंग एजन्सीं केले आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं.
10 वर्षांत अर्थव्यवस्था डबल
संपूर्ण जगाचे लक्ष आता भारतावर आहे. तुम्ही जगातील कुठल्या भागातही जा, तिथे लोक भारताबद्दल एक विलक्षण जिज्ञासा दाखवतात. 70 वर्षांमध्ये जे देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती, ते आज किती बदलली आहे. IMF ने म्हटले आहे की भारत एकटा असा देश आहे, ज्याने त्याची अर्थव्यवस्था डबल केली आहे. गेल्या 10 वर्षांत भारताने त्याच्या अर्थव्यवस्थेत 2 लाख कोटी डॉलर किंवा 2 ट्रिलियन डॉलर जोडले आहेत, अशी माहिती नरेंद्र मोदी यांनी दिली.
आखिर काय आहे IMF चा अहवाल?
IMF ने आपल्या ताज्या अहवालात भारतीय अर्थव्यवस्थेवर भाष्य केलं आहे. गेल्या एका दशकात भारताचा जीडीपी वाढीचा दर दुप्पट झाला आहे, आणि 2025 च्या अखेरपर्यंत देशाचा जीडीपी 4.27 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. IMF च्या आकड्यांनुसार, 2015 मध्ये भारताचा जीडीपी 2.1 ट्रिलियन डॉलर होता (सद्याच्या किमतींवर), आणि 2025 च्या अखेरपर्यंत 4.27 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. याचा अर्थ आहे की, गेल्या 10 वर्षांत जीडीपी दुप्पट होण्याचा अंदाज आहे. IMF च्या अहवालानुसार, 2025 साठी भारताचा वास्तविक जीडीपी वाढीचा दर 6.5% आहे, जो अर्थव्यवस्थेच्या मजबूत आणि स्थिर विस्ताराचा संकेत देतो. महागाईच्या संदर्भात IMF ने म्हटले की, ती “आर्थिक परिस्थितीवर प्रभाव टाकणारा एक महत्त्वाचा घटक” आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने महागाईला 4-6% च्या मर्यादेत ठेवण्याचे लक्ष्य ठरवले आहे.
युवकांची स्किलिंग प्रक्रिया
जीडीपी डबल होणे फक्त आकड्यांचा बदल नाही, तर त्याचा प्रभाव देखील दिसतो आहे. 25 कोटी लोक दारिद्ररेषेतून बाहेर पडले आहेत आणि ते आज न्यू मिडल क्लासचा भाग बनले आहेत, जे देशाच्या अर्थव्यवस्थेला योगदान देत आहे आणि त्याला वायब्रंट बनवत आहे. आज जगातील सर्वात मोठी युवा लोकसंख्या भारतात आहे, जी स्किल्ड होत आहे आणि इनोव्हेशनला गती देत आहे, आणि याचदरम्यान भारताची परराष्ट्र धोरणाचे मंत्र बनले आहे ‘इंडिया फर्स्ट’. आज जगाला भारताच्या इनोव्हेशनचे महत्व कधीच इतके दिले गेले नाही. आज जगाला हे जाणून घ्यायचं आहे की ‘व्हाट इंडिया थिंक्स टुडे’.