या मोफत योजनेची आता होणार अंमलबजावणी, देशातील 1 कोटी घरांना होणार फायदा

PM Surya Ghar Yojana : पीएम सूर्य घर योजनेला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात आता या योजनेची अंमलबजावणी होणार आहे. देशातील दुर्गम भागात अंधार जाऊन प्रकाशाचं राज्य येईल.

या मोफत योजनेची आता होणार अंमलबजावणी, देशातील 1 कोटी घरांना होणार फायदा
PM Surya Ghar Yojana
Follow us
| Updated on: Jun 11, 2024 | 2:58 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरु होत आहे. पीएम सुर्योदय योजनेचा निवडणुकीपू्र्वी गाजावाजा झाला. पीएम सूर्य घर योजनेची घोषणा झाल्यानंतर या योजनेला जबरदस्त प्रतिसाद मिळाला. ही योजना 75,000 कोटी रुपयांची आहे. 1 कोटी घरांना प्रत्येकी 300 युनिट मोफत वीज पुरविण्याचे या योजनेचे लक्ष्य आहे. या योजनेमुळे ग्रीन एनर्जीला प्रोत्साहन मिळेल आणि कार्बन उत्सर्जन कमी होऊन पर्यावरणाचे संरक्षण होईल. या योजनेतंर्गत नागरिकांना त्यांच्या छतावर सोलर पॅनल लावता येतील. योजना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावी यासाठी सवलतींचा पाऊस पडला आहे.

काय आहे ही योजना

PM Surya Ghar Yojana मध्ये सूर्याच्या ऊर्जेपासून वीज निर्मिती करण्यात येईल. या योजनेसाठी ग्राहकांना सबसिडी मिळणार आहे.ग्राहकांना या योजनेतंर्गत 300 युनिट वीज मोफत मिळेल. अधिक वीज उत्पादन झाले तर त्यातून 18000 रुपयांपर्यंत कमाई करता येईल. या योजनेसाठी केंद्र सरकारने 75000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेत या योजनेसाठी कर्ज मागितल्यास त्यावर ग्राहकांना सवलत पण मिळेल. या योजनेसाठी ग्राहकांना ऑनलाईन अर्ज करता येईल. https://pmsuryaghar.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. Rooftop Solar Scheme या पर्यायावर क्लिक करावे लागेल.

हे सुद्धा वाचा

अशी मिळेल सबसिडी

या योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. या योजनेतंर्गत ग्राहकांना सबसिडी देण्यात येत आहे. ग्राहक किती किलोवॅटचे सोलर पॅनल बसवतो, त्यावर तितकी सबसिडी मिळेल. एक किलोवॅट (1 KW) सोलर पॅनल लावल्यावर सरकार 18,000 रुपये सवलत देते. तर 2 किलोवॅटच्या पॅनलवर 30 हजार रुपये सबसिडी मिळते. तर 3 किलोवॅटचे पॅनल लावल्यास सरकार 78 हजार रुपयांची सवलत देते.

मिळाला मोठा प्रतिसाद

छतावर सोलर पॅनल लावून वीज निर्मितीच्या पीएम सूर्योदय योजनेला (PM Suryoday Yojana) मोठा प्रतिसाद मिळाला. मार्च महिन्यापासून या योजनेसाठी नाव नोंदणीला सुरुवात झाली. पीएम सूर्य घर योजनेसाठी नोंदणी सुरु झाली. असम, बिहार, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशा, तामिळानाडू आणि उत्तर प्रदेशमधून योजनेला भरभरुन प्रतिसाद मिळाला.

कोणाला करता येईल अर्ज

कोणताही भारतीय नागरीक, संस्था

स्वतःचे घर हवे आणि त्यावर मोकळी जागा हवी

हे घर मजबूत आणि छतावर सहज सोलर पॅनल बसविता येण्याची सुविधा असावी

अर्जदाराकडे वीज जोडणी असावी

कसा कराल अर्ज

https://pmsuryaghar.gov.in/consumerRegistration वर जा

या ठिकाणी नाव, पत्ता आणि इतर संपूर्ण तपशील भरा

या ठिकाणी सबसिडी किती मिळणार हे पण तपासता येईल

भविष्यात या योजनेत केवळ घराच्या छतावरच नाही तर शेत, मोकळ्या जागेवर पण सोलर पॅनल लागतील

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.