नवी दिल्ली : आता तुम्हाला व्यवसाय सुरु करण्यासाठी सहज कर्ज मिळेल. आजकाल साधा व्यवसाय (Business Loan) सुरु करायचा असला तरी गाठीशी पैसा लागतो. नवीन व्यवसायासाठी भांडवल लागतेच. तुमच्याकडे चांगली आयडिया असेल आणि अगदी अल्प गुंतवणुकीत (Investment) व्यवसाय उभारता येत असेल तर ही योजना तुमच्यासाठीच. या योजनेत तुम्हाला विना तारण (Guarantee free loan), कमी कागदपत्रांआधारे कर्ज मिळविता येईल. केंद्र सरकार तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज मिळवून देईल. फक्त तुमची कष्ट करण्याची तयारी हवी. देशातील गरीब आणि होतकरु तरुणांना, व्यावसायिकांना आर्थिक बळ देण्यासाठी केंद्र सरकारने ही खास योजना आणली आहे. त्यामुळे बाजारातून मोठ्या व्याजाने रक्कम घेण्याची गरज नाही. तुम्हाला या योजनेत विना तारण आणि खात्यात शिल्लक रक्कम नसतानाही कर्ज पुरवठा करणार आहे.
आर्थिक चणचण असताना तुमचे व्यवसायाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी मोठ्या बँकेकडून चढ्या व्याज दराने कर्ज घेण्याची अजिबात गरज नाही. कारण केंद्र सरकार होतकरूंना कर्जचा पुरवठा करत आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही रक्कम, मालमत्ता, वस्तू गहाण ठेवायची नाही. तारण ठेवायची नाही.
या योजनेचे नाव पंतप्रधान स्वनिधी योजना असे आहे. या योजनेतंर्गत तुम्हाला 50 हजार रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध होते. या योजनेतंर्गत सर्वात अगोदर तुम्हाला 10 हजार रुपयांचे कर्ज मिळेल. हे कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला वाढीव कर्जासाठी अर्ज करता येईल.
10 हजार रुपयांचे कर्ज फेडल्यानंतर तुम्हाला 20 हजार रुपयांच्या कर्जासाठी अर्ज दाखल करता येतो. बँक तुम्हाला मागील कामगिरीमुळे आणि कर्ज वेळेत फेडल्याने हे कर्ज मंजूर करेल. त्याआधारे तुम्ही व्यवसायाला बळ देऊ शकता. तुमचा व्यवसाय वाढवू शकता.
20 हजार रुपयांच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर तुमच्यावरचा विश्वास सहाजिकच वाढलेला असेल. 20 हजार रुपयांचे कर्ज फेडल्याने तुम्ही पुढील वाढीवा रक्कमेसाठी पात्र ठराल. 50 हजार रुपयांच्या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करता येईल. या योजनेत टप्प्याटप्प्याने कर्ज मिळते.
आता ही रक्कम मोठी असल्याने बँक तुमच्याकडे काही कागदपत्रांची मागणी करेल. त्यानुसार, तुम्हाला कागदपत्रांची पुर्तता करावी लागेल. त्याआधारे बँक तुम्हाला 50 हजार रुपयांचे कर्ज देईल. या कर्जाची परतफेड वेळेत केल्यास तुमच्यावरचा बँकेचा विश्वास वाढेल.
या योजनेत तुम्हाला कर्ज हवे असेल तर त्यासाठी एक अट आहे. तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. या योजनेत अगोदर 10 हजार रुपयांचं, त्यानंतर 20 हजार रुपयांचं कर्ज मिळते. परतफेडीचे धोरण बघून 50 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येते.
या योजनेत कर्ज देताना तुमच्याकडून कोणतेही तारण घेत नाही. कोणतीही वस्तू गहाण ठेवण्यास सांगत नाही. सुरुवातीला 10 हजार रुपयांचं कर्ज मिळते. या कर्जावर तुम्हाला मासिक परतफेड करता येते.