पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ

पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली (PMC Bank customers Withdraw limit) आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे.

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ
Follow us
| Updated on: Oct 14, 2019 | 11:42 PM

नवी दिल्ली : पीएमसी बँकेतून पैसे काढण्याची मर्यादा पुन्हा एकदा वाढवण्यात आली (PMC Bank customers Withdraw limit) आहे. आरबीआयकडून नुकतंच याबाबतचं पत्रक काढण्यात आलं आहे. आरबीआयने पंजाब महाराष्ट्र बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध टाकल्याने ग्राहकांना पैसे काढण्यास कठीण जात (PMC Bank customers Withdraw limit) होते. मात्र आता ही पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्यात आली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला (PMC Bank customers Withdraw limit) आहे.

आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या नव्या पत्रकानुसार, आता पीएमसी बँकेतील ग्राहकांना 40 हजार रुपये काढता येणार आहे. सध्या ही मर्यादा 25 हजार आहे. आर्थिक अनियमितता आढळल्याने आरबीआयने या बँकावर निर्बंध लागू केले होते.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांची नुकतीचं भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी ग्राहकांच्या सर्व अडचणी दूर करा, अशी विनंती केली होती. त्यावर शक्तीकांत दास यांनीही ग्राहकांच्या हक्कांचं संरक्षण करण्यात येईल असं आश्वासन दिलं  होतं.

आरबीआयने आतापर्यंत तीन वेळा पैसे काढण्याच्या मर्यादेमध्ये वाढ केली आहे. सुरुवातीला आरबीआयने ग्राहकांना महिन्यातून केवळ 1 हजार रुपये काढण्याचे निर्बंध लादले होते. मात्र, ग्राहकांचा असंतोष पाहता ही मर्यादा वाढवून 6 महिन्यात 10 हजारांवर नेली. हे 10 हजार एकावेळी काढू शकता किंवा टप्प्याटप्प्यानी काढू शकता.

पण 6 महिन्यातून केवळ 10 हजार रुपयेच काढता येतील. मात्र, तरिही दैनंदिन खर्च, आजार, शिक्षण आणि इतर गोष्टींवरील खर्चासाठी ही रक्कम तोकडी असल्याची ग्राहकांची तक्रार आहे. यानंतर 26 सप्टेंबरला ही मर्यादा वाढवून 10 हजार करण्यात आली. तसेच 3 ऑक्टोबरला या मर्यादेत वाढ करुन ती 25 हजार केली होती.

बँकेवर कोणकोणते निर्बंध?

रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देता येणार नाही जुन्या कर्जांचे नूतनीकरण करता येणार नाही बँकेला कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही नव्या ठेवी स्वीकारता येणार नाहीत बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करता येणार नाही कर्मचाऱ्यांचे पगार, जागेचे भाडे, कर, विज बिल, प्रिंटिंग, स्टेशनरी, कायदेशीर खर्च यासाठी खर्च करता येईल वकिलांना प्रत्येक खटल्यामध्ये पाच हजारापेक्षा अधिक रक्कम देता येणार नाही

भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात...
'लाडक्या बहिणीं'नो मोठी बातमी, लाभार्थी महिलांना याच महिन्यात....