PMSBY Scheme : 31 मेपूर्वी बँक तुमच्या खात्यातून 12 रुपये कापणार, ग्राहकांना 2 लाखांचा फायदा

बँका सध्या त्यांच्या बचत खातेधारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी (PMSBY) प्रीमियम वजा करण्याबाबत एसएमएस (SMS) पाठवत आहेत.

PMSBY Scheme : 31 मेपूर्वी बँक तुमच्या खात्यातून 12 रुपये कापणार, ग्राहकांना 2 लाखांचा फायदा
rupees Note
Follow us
| Updated on: May 22, 2021 | 10:20 PM

नवी दिल्ली : बँका सध्या त्यांच्या बचत खातेधारकांना पंतप्रधान सुरक्षा विमा योजनेसाठी (PMSBY) प्रीमियम वजा करण्याबाबत एसएमएस (SMS) पाठवत आहेत. ज्यांनी PMSBY योजनेसाठी नावनोंदणी केली आहे, त्यांच्यासाठीच बँक खाते डेबिट केले जाईल, असे सांगण्यात येत आहे. PMSBY योजनेसाठी बँकेत अर्ज भरता येईल किंवा बँकेच्या नेटबँकिंगवर लॉग इन करून ऑनलाईन अर्ज करता येतो. (PMSBY Scheme; Banks to deduct premium of Rs 12 before 31 May 2021 and user will get Benefits of 2 lakh Rs)

पंतप्रधान सुरक्षा विमा योजना (PMSBYयोजनेसाठी) ही एक अशी योजना आहे जी अपघाती मृत्यू आणि अपंगत्व आल्यास विमा प्रदान करते. यात एक वर्षाचा विमा कव्हर आहे आणि वैयक्तिकरित्या दरवर्षी नूतनीकरण करता येतं. ज्यांनी यापूर्वीच पीएमएसबीवाय योजनेसाठी नोंदणी केली आहे, त्यांच्या खात्यातून ऑटो डेबिट सुविधेद्वारे 12 रुपये (जीएसटीसह) प्रीमियम वजा केले जाते. आपले बँक खाते सहसा दर वर्षी 25 मे ते 31 मे दरम्यान डेबिट केले जाते.

पैसे कधी वजा केले जातात?

पॉलिसीच्या नूतनीकरणासाठी प्रीमियम 25 मे ते 31 मे दरम्यान आपोआप डेबिट केले जाईल, खातेधारकाने बँकेला पॉलिसी रद्द करण्याची विनंती न केल्यास हे पैसे कापले जातात.

PMSBY योजनेचा कव्हरेज कालावधी दरवर्षी 1 जून ते 31 मे दरम्यान असतो. म्हणूनच, जर कोणाला ही योजना सुरू ठेवायची असेल तर नूतनीकरण प्रीमियम दरवर्षी मे महिन्यात भरला जाईल. योजनेत सामील होताना बँक खात्यात ऑटो-डेबिटसाठी संमती देणे बंधनकारक आहे.

18-70 वयोगटातील लोक PMSBY साठी अर्ज करू शकतात. या योजनेंतर्गत, विमा घेणार्‍याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा संपूर्ण अपंगत्व असल्यास 2 लाख रुपयांचा अपघात विमा दिला जातो. कायमस्वरूपी आंशिक अपंगत्व आल्यास 1 लाख रुपयांचे कव्हर प्रदान केले जाते.

क्लेमची प्रकिया काय?

विम्याची रक्कम क्लेम करण्यासाठी, नॉमिनी (उमेदवार) किंवा संबंधित व्यक्तीने प्रथम बँक किंवा विमा कंपनीकडे जाणे आवश्यक आहे. जिथून पॉलिसी खरेदी केली आहे तिथे एक फॉर्म मिळेल, नॉमिनीला तो फॉर्म भरून जमा करावा लागेल. यामध्ये नाव, पत्ता आणि फोन नंबर यांसारखी माहिती त्यात भरावी लागेल.

सर्व संबंधित कागदपत्रांसह विमा कंपनीला भरलेला फॉर्म सबमिट करा. मृत्यू प्रमाणपत्र किंवा अपंगत्व प्रमाणपत्र समाविष्ट करणे आवश्यक आहे. यानंतर विमा कंपनी सर्व कागदपत्रांची तपासणी करेल. जर सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर क्लेम रक्कम तुम्ही सांगितलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल आणि अशा प्रकारे क्लेम सेटलमेंटची प्रक्रिया पूर्ण होईल.

इतर बातम्या

आधी SBI, आता कॅनरा बँक, खातेदारांच्या अकाऊंटमधून 142 रुपये का कट होत आहेत?

LIC च्या ‘या प्लॅन’ मधून दरमहा 9250 रुपये पेन्शन मिळवा, मॅच्युरिटीनंतर 15 लाखही मिळणार, वाचा सविस्तर

कॅनरा आणि सिंडिकेट बँकेत अकाऊंट असल्यास लक्ष द्या, अन्यथा होणार मोठं नुकसान

(PMSBY Scheme; Banks to deduct premium of Rs 12 before 31 May 2021 and user will get Benefits of 2 lakh Rs)

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.