पीएनबीकडून 2370 बँकांचे IFSC आणि MICR कोड जारी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लिस्ट पहा

पीएनबीकडून 2370 बँकांचे IFSC आणि MICR कोड जारी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लिस्ट पहा (PNB issues IFSC and MICR codes of 2370 banks)

पीएनबीकडून 2370 बँकांचे IFSC आणि MICR कोड जारी, ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करण्यासाठी लिस्ट पहा
Follow us
| Updated on: Feb 13, 2021 | 6:40 PM

नवी दिल्ली : ऑरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स (OBC) आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया (UBI)चे पंजाब नॅशनल बँके(पीएनबी)त विलीनीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे या बँकाचे अस्तित्व संपले आहे. विलीनाकरणानंतर बँकांचे आयएफएससी(IFSC) बदलले असून पीएनबीकडून या बदलेल्या आयएफएससी आणि एमआयसीआर कोडची यादी जारी करण्यात आली आहे. दोन्ही बँकांचे ग्राहक पीएनबीमध्ये शिफ्ट झाले आहेत. त्यामुळे ग्राहकांना ऑनलाईन ट्रान्झेक्शन करताना कोणतीही अडचण होई नये म्हणून पीएनबीने यादी जारी करुन बदललेल्या कोड उपलब्ध केले आहेत. (PNB issues IFSC and MICR codes of 2370 banks)

ऑनलाईन बँकिंग प्रणालीने आपले आयुष्य खूप सुलभ बनवले आहे. एखाद्या दुकानदाराला किंवा सर्व्हिस प्रोवायडरला पैसे देणे, रिचार्ज करणे, बिल भरणे किंवा एखाद्यास पैसे हस्तांतरित करायचे असल्या, काही सेकंदात आपल्याला हे काम ऑनलाईन करू शकतो. प्रत्येक बँकेचे स्वतःचे मोबाईल अ‍ॅप आहे, ज्याद्वारे ते आणखी सोपे झाले आहे. मोबाईल बँकिंग किंवा इंटरनेट बँकिंगद्वारे ऑनलाईन व्यवहारांसाठी खाते क्रमांक, बँकेचे नाव, खातेधारकाचे नाव याशिवाय सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे ती आयएफएससी कोड. ऑनलाईन पैसे हस्तांतरीत करताना चूक झाल्यास मोठे नुकसान होऊ शकते. अशा वेळी जर बँकांचा आयएफएससी कोड बदलत असेल तर अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.

2370 बँक शाखांचे बदलले कोड

पीएनबी अर्थात पंजाब नॅशनल बँकेने अलीकडेच काही महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला होता. बँकेने असे म्हटले होते की 31 मार्च 2021 नंतर बँकेच्या जुन्या आयएफएससी, एमआयसीआर कोड कार्य करणार नाहीत. आता पीएनबीने हे नविन कोड जारी केले आहेत. देशभरातील 2370 शाखांचे कोड बँकेने जारी केले आहेत.

आयएफएससी कोड म्हणजे काय?

आयएफएससी हा 11-अंकी कोड आहे. हा कोड रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना दिला आहे. 11 वर्णांचा हा कोड इलेक्ट्रॉनिक पेमेंटमध्ये वापरला जातो. सुरुवातीच्या चार अंकांवरून बँकेचे नाव ज्ञात आहे. त्यातील पाचवा अंक शून्य आहे. त्यानंतरचे 6 अंक शाखा कोड दर्शवितात. त्या कोडद्वारे बँकेच्या कोणत्याही शाखेस ट्रॅक केले जाऊ शकते. आयएफएससी कोडचा वापर नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर (एनईएफटी) आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट (आरटीजीएस) मध्ये वापरला जातो. तुम्ही अनेक मार्गांनी आयएफएससी कोड शोधू शकता. बँकेची वेबसाईट, बँक खाते आणि चेक बुकद्वारे शोधू शकता. याशिवाय बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानावर खाते क्रमांक, पत्ता, शाखा कोड, आयएफएससी कोड आणि खातेधारकाचे नाव यासारखी माहिती असते. चेकबुकमध्ये, आयएफएससी कोड वर लिहिलेला आहे, काहींमध्ये तो खाली दिलेला आहे.

एमआयसीआर कोड म्हणजे काय?

एमआयसीआर कोड मॅग्नेटिक इंक कॅरेक्टर रिकग्निशन आहे. जसे आपण त्याच्या नावावरून समजू शकता की हे कॅरेक्टर रिकग्निशनवर आधारीत आहे. हा बँकेच्या चेक बुकवर वापरला जातो. तुम्ही चेकवर एमआयसीआर कोड लिहिलेला पाहिला असेल. हा कोड चेकवर मॅग्नेटिक इंकने छापण्यात येतो. याचा उपयोग मुख्यतः सुरक्षित बारकोडप्रमाणे ट्रान्झेक्शन प्रोटक्ट करण्यासाठी केला जातो. एमआयसीआर कोड 9 अंकांचा असतो. प्रत्येक बँक शाखेचा एक युनिक एमआयसीआर कोड असतो. एमआयसीआर कोडमधील पहिले तीन अंक शहराचे नाव दर्शवतात. पुढच्या तीन अंकांमध्ये बँकेचे नाव दिलेले असते आणि शेवटचे तीन अंक बँक शाखेचा कोड असतो. (PNB issues IFSC and MICR codes of 2370 banks)

इतर बातम्या

फेक विमा कंपनीचा आयआरडीएआयकडून पर्दाफाश, कंपनीकडून पॉलिसी खरेदी न करण्याचे आवाहन

बॅन केलेलं TikTok पुन्हा येणार; ‘ही’ भारतीय कंपनी अ‍ॅप खरेदीसाठी इच्छूक

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.