New Rules : या महिन्यात पुन्हा खिशाला कात्री, बँकांच्या व्याजदरात वाढीची शक्यता, बॅलन्स अलर्ट होईल बंद, डिसेंबरमध्ये येईल हा बदल..

New Rules : या महिन्यात बँक ठेवीदारांच्या खिशाला कात्री लागू शकते..

New Rules : या महिन्यात पुन्हा खिशाला कात्री, बँकांच्या व्याजदरात वाढीची शक्यता, बॅलन्स अलर्ट होईल बंद, डिसेंबरमध्ये येईल हा बदल..
हे होतील बदलImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 10:11 PM

नवी दिल्ली : या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात, डिसेंबरमध्ये बँकेच्या धोरणात (Bank Policy) अनेक बदल होत आहे. या महिन्यात पैशांबाबत बदल होणार आहे. या बदलांचा तुमच्यावर परिणाम होईल. या महिन्यात केंद्रीय बँकेने (RBI) डिजिटल रुपयाचा पायलट प्रकल्प सुरु केला आहे. तर वाहन कर्ज आणि वैयक्तिक कर्जावरील व्याज दर वाढू शकतात. डिसेंबरमध्ये पतधोरण समितीची (MPC) बैठक होणार आहे. त्यात रेपो रेट (Repo Rate) वाढण्याची शक्यता आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 1 डिसेंबरपासून डिजिटल रुपया (Digital Rupee) सुरु केला आहे. या पायलट प्रकल्पात त्याच्या सार्वजनिक वापराचा प्रयोग करण्यात येत आहे. सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील 8 बँका या प्रयोगात सहभागी झाल्या आहेत.

किरकोळ वापरासाठी डिजिटल रुपया एका डिजिटल टोकन रुपात वापरता येईल. 1 डिसेंबरपासून काही मोजक्याच शहरात हा प्रयोग राबविण्यात आला. किरकोळ डिजिटल रुपयाचा (Retail Digital Rupee) वापर मोबाईलमधील डिजिटल वॉलेटच्या माध्यमातून करण्यात येईल.

हे सुद्धा वाचा

मनी कंट्रोलच्या एका अहवालानुसार, यस बँकेने 1 डिसेंबरपासून बँलेन्स अलर्ट मॅसेज सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत या सेवेचा कालावधी सुरु आहे. तोपर्यंत ग्राहकांना बँलेन्स अलर्ट मिळेल. त्यानंतर ही सेवा आपोआप बंद होईल.

सायबर फसवणुकीला आळा घालण्यासाठी यस बँकेने (Yes Bank SMS Alert Service) सेवा खंडीत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सायबर भामट्यांना ग्राहकांची फसवणूक करता येणार नसल्याचा दावा करण्यात येत आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीची (MPC) बैठक 7 डिसेंबर रोजी होत आहे. या बैठकीत रेपो दरात वाढीची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, रेपो दरात 35 बेसिस पॉईंटसची वाढ होईल.

ऑक्टोबर महिन्यात किरकोळ महागाईत घट झाली. त्यामुळे केंद्रीय बँक यावेळी रेपो दरात मोठी वृद्धी करणार नसल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. आरबीआयने मे महिन्यापासून ते आतापर्यंत रेपो दरात 190 बेसिस पॉईंट्स वाढ केली आहे.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.