मुंबई : स्मार्टफोन ब्रँड पोको इंडियाने (POCO India) सोमवारी सांगितले की, या वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (Q1 2021) त्यांच्या व्यवसायात तब्ब्ल 300 टक्क्यांची वाढ झाली आहे. आता हा देशातील सर्वात वेगाने ग्रोथ करणारा ब्रँड बनला आहे. (Poco India sets new record 300 percent growth in first quarter of 2021)
पोको इंडिया ब्रँड अवघ्या 10 महिन्यांत देशातील अव्वल 3 ऑनलाईन स्मार्टफोन दिग्गजांमध्ये सामील झाला आहे. पोको इंडियाचे कंट्री डायरेक्टर अनुज शर्मा म्हणाले की, केवळ दहा महिन्यांत ऑनलाईन स्मार्टफोनच्या क्षेत्रात अव्वल 3 मध्ये आमचा समावेश होणं हा आमच्या चाहत्यांकडून व ग्राहकांकडून मिळालेल्या प्रेमाचा आणि विश्वासाचा दाखला आहे. या विश्वासामुळे 2021 च्या पहिल्या तिमाहीत अव्वल 10 स्मार्टफोन ब्रँडमधील सर्वाधिक ग्रोथ करत आम्हाला आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यास मदत झाली आहे.
गेल्या वर्षी, POCO X2 फ्लिपकार्टवर मार्च महिन्यात 15,000 ते 20,000 रुपयांच्या प्राईस सेगमेंटमध्ये लाँच झाला होता. हा फोन या सेगमेंटमध्ये फ्लिपकार्टवर सर्वाधिक विकला जाणारा स्मार्टफोन बनला होता आणि 20K सेगमेटअंतर्गत एक उत्कृष्ट फोन म्हणून POCO X3 ला सर्वाधिक पसंती मिळाली होती. त्यानंतर POCO C3 आणि POCO M3 या दोन स्मार्टफोन्सनी गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय मार्केटमध्ये धुमाकूळ घातला आहे.
कंपनीने अशी माहिती दिली आहे की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये लाँच झालेल्या POCO M3 ने लाँचिंगनंतर अवघ्या 45 दिवसात 5,00,000 युनिट्सची विक्री केली आहे. अनुज शर्मा म्हणाले की, आम्ही खूप जलद गतीने भारतीय बाजारात वेगाने पुढे जात आहोत, परंतु ते करत असताना आण्ही आमच्या डिव्हाइसच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता उत्कृष्ट आणि आकर्षक ऑफर देण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.
अनुज शर्मा म्हणाले की, “टेकमध्ये लेगसी (legacy) ब्रँड असे काही नसते. Apple किंवा Samsung अजूनही रिलीवेंट आहेत, कारण ते दरवर्षी उत्कृष्ट उत्पादने बाजारात सादर करत आहेत. शाओमी अजूनही चर्चेत राहण्याचे कारण म्हणजे त्यांनी Mi 11 अल्ट्रा किंवा Mi मिक्स फोल्ड सारखी उत्पादने सादर केली आहेत. रिलीवेंट राहण्यासाठी बदलांसह अपडेट होणे आवश्यक आहे. केवळ एक प्रकारची रणनीती नेहमीच काम करत नाही.”
इतर बातम्या
15 हजार रुपयांहून कमी किंमतीत 5G स्मार्टफोन, जाणून घ्या टॉप 5 स्मार्टफोन्सचे फीचर्स
6000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा, 6GB रॅमसह दमदार फोन बाजारात, किंमत 10,000 रुपयांहून कमी
48MP ट्रिपल कॅमेरा, 5000mAh बॅटरी, Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, किंमत…
Poco India sets new record 300 percent growth in first quarter of 2021)