गावात घर नाही, पगार फक्त 1 हजार रुपये… खेड्यातील पोराने शेअर मार्केटमध्ये कमावले करोडो रुपये; काय आहे ट्रिक?
पोरिंजू वेलियाथ यांचा जीवनप्रवास हा प्रेरणादायी आहे. 16 व्या वर्षी घराबाहेर पडून त्यांनी अनेक संकटांना तोंड दिला. 1000 रुपयांच्या पगाराची नोकरी करूनही त्यांनी शेअर बाजारात यश मिळवले. कठोर परिश्रम आणि ध्येयनिष्ठेमुळे त्यांनी कोट्यवधींची संपत्ती निर्माण केली.
वयाच्या 16 व्या वर्षी त्या मुलाने घर सोडलं. त्याने शेअर मार्केटमध्ये कोट्यवधी कमावले. एका छोट्या खेड्यातून तो निघाला. त्याने स्टॉक मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख तयार केली. कठोर मेहनतीच्या बळावर त्याने हे कलं. एकवेळ अशी होती की, त्याला केवळ एक हजार रुपये पगारावर नोकरी करावी लागली होती. गावाकडे घर नव्हतं. पण तो हारला नाही. थकला नाही. निराश झाला नाही. त्याने नेटाने प्रयत्न सुरू केले. आणि त्याने आपलं स्वत:चं साम्राज्य निर्माण केलं. स्मॉल कॅपचे किंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या गुंतवणूकदार पोरिंजू वेलियाथ यांच्याबद्दल आपण पोलतोय. त्यांचा पोर्टफोलियो जबरदस्त प्रॉफिट देत आहे. शेअर बाजारात त्यांच्या प्रत्येक छोट्या मोठ्या अॅक्शनवर सर्वांची नजर असते. कोण आहे पोरिंजू वेलियाथ? कसा आहे त्यांचा प्रवास?
पोरिंजू वेलियाथ कोण आहे?
पोरिंज वेलियाथ हे 61 वर्षाचे आहेत. दिग्गज गुंतवणूकदारांमध्ये त्यांचं नाव येतं. 1962 रोजी केरळच्या कोच्चितील त्रिशूरमध्ये त्यांचा जन्म झाला. त्रिशूर हे त्याकाळी एक छोटसं खेडं होतं. कुटुंबात आर्थिक चणचण होती. त्यामुळे अवघ्या वयाच्या 16 व्या वर्षी त्यांना घर सोडावं लागलं. त्यांच्याकडे राहायला घर नव्हतं. असं असतानाही त्यांना अकाऊंटंटची नोकरी सुरू केली. त्यांना पगार म्हणून दर महिन्याला एक हजार रुपये मिळायचे. काही काळानंतर त्यांनी फोन ऑपरेटरची नोकरी पत्करली. त्यावेळी त्यांना 2500 रुपये पगार मिळत होता. जेव्हा मी पहिली नोकरी सुरू केली तेव्हा आमच्याकडे राहायला घरही नव्हतं. पण घरची परिस्थिती सुधारण्यासाठी मेहनतीशिवाय पर्याय नव्हता, असं वेलियाथ यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.
शेअर मार्केटमध्ये एन्ट्री कशी झाली?
पोरिंज वेलियाथ यांची 1990मध्ये शेअर मार्केटमध्ये एन्ट्री झाली. कोटक सेक्युरिटीजमध्ये ते समाली झाले. त्यांना फ्लोअर ट्रेडरचं काम मिळालं. त्यामुळे ते मुंबईत आले. मुंबईत आल्यावर त्यांनी आपलं नाव बदलून फ्रान्सिस ठेवलं. त्यानंतर रिसर्च अॅनालिस्ट, फंड मॅनेजर आदी पदांवर त्यांनी काम केलं. त्यांनी शेअर मार्केटमधील प्रत्येक छोटीछोटी गोष्ट जाणून घेतली.
गावात आले आणि…
मुंबईत शेअर मार्केटमध्ये पैसा कमावल्यानंतर पोरिंज वेलियाथ परत गावाला आले. 2002मध्ये कोच्चित इक्विटी इंटेलिजन्स नावाची फनी फंड मॅनेजमेंट नावाची कंपनी बनवली. एकाचवेळी पोर्टफोलियो सांभाळून दुसऱ्यांचे पैसेही ते मॅनेज करू लागले. सप्टेंबर 2021मध्ये त्यांचा पोर्टफोलियो 213.11 कोटीचा होता. शेअर मार्केटशिवाय आर्य वैद्य फार्मसीही ते चालवत आहेत. त्यांची कंपनी हिंदुस्तान यूनिलिव्हर लिमिटेडसोबत मिळून लिव्हर आयुष ब्रँडने प्रोडक्ट्स तयार करत आहे. ‘The Complete Step by Step Guide to the Stock Market and Investing’ हे त्यांचं पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.
पोरिंजू वेलिया यांचा पोर्टफोलिओ
दिग्गज गुंतवणूक वेलियाथ यांची नेटवर्क कोट्यवधीत आहे. त्यांच्याकडे अलिशान फार्महाऊस आणि अनेक लग्झरी कार आहेत. गेल्या वर्षी एप्रिलपर्यंत त्यांच्याकडे 120 कोटी रुपये संपत्ती होती. केवळ 8 वर्षात त्यांनी ही संपत्ती बनवली आहे. या दरम्यान त्यांच्या शेअरमध्ये 2,000% हून अधिक रिटर्न मिळाले आहे. ट्रेंडलाइन डॉट कॉमनुसार डिसेंबर 2015मध्ये त्यांचा पोर्टफोलिओ केवळ 5.87 कोटी होता. तो आज अनेकपटीने वाढला आहे.