Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा

आज आम्ही तुम्हाला एका अशा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिना 990 रुपये जमा करुन 69,002 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

Post office RD : पोस्टाची भन्नाट योजना, 990 रुपयांची गुंतवणूक करा आणि 69,002 रुपये मिळवा
Post Office
Follow us
| Updated on: Jun 04, 2021 | 1:10 PM

मुंबई : रिकरिंग डिपॉझिट हा सामान्य लोकांचा पैसा वाचवण्याचा सर्वात जुना पर्याय आहे. या गुंतवणूकीच्या या पद्धतीचा दरमहा थोडीशी रक्कम जमा करुन तुम्ही एक मोठी गुंतवणूक करु शकता, हा याचा सर्वात मोठा फायदा मानल जातो. जर तुम्ही निश्चित कालावधीसाठी अल्प प्रमाणात गुंतवणूक केली तर तुमची गुंतवणूक वाढू शकते. ते तुम्हाला काही वर्षानंतर फायदेशीर ठरु शकते. आज आम्ही तुम्हाला एका अशा पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही दर महिना 990 रुपये जमा करुन 69,002 रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळवू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

पोस्ट ऑफिसमधील रेकरिंग डिपॉझिट या योजनेवर 5.80 टक्के वार्षिक व्याज मिळतो. त्यामुळे जर तुम्ही दर महिना 990 रुपये जमा केले तर 60 महिन्यात तुमची एकूण रक्कम ही 59,400 रुपये इतकी होते. या रक्कमेवर तुम्हाला 9,602 रुपये व्याज मिळतो. यानुसार तुम्हाला 69,002 रुपये मिळतात.

खाते कसे उघडाल?

पोस्ट ऑफिसमध्ये कोणतीही व्यक्ती सहज तुमचे खाते उघडू शकते. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल. त्यानंतर आवश्यक माहितीसह अर्ज भरुन तो जमा करावा लागेल. पोस्ट ऑफिसमध्ये वेगवेगळ्या योजनांमध्ये 7.4 टक्के व्याज मिळतो. त्यासोबतच रेकरिंग डिपॉझिटसह इतर योजनांची माहिती तुम्हाला पोस्टाच्या अधिकृत वेबसाईटवरही मिळू शकते. पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला दरमहा एक निश्चित रक्कम जमा करावी लागते. ही रक्कम नेमकी किती असावी, हे तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर  मॅच्युरिटीच्या वेळी तुम्हाला व्याजासह संपूर्ण रक्कम मिळते.

रिकरिंग डिपॉझिट योजना खास का?

अनेक पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये रिकरिंग डिपॉझिट ही एक लोकप्रिय योजना आहे. कारण यात तुम्हाला व्याजदर चांगला मिळतो. त्यासोबतच कमी पैशात तुम्ही जास्तीत जास्त रक्कम गुंतवू शकता. भारतीय टपाल विभाग देशभरातील 1.5 लाख टपाल कार्यालयांतून विविध प्रकारच्या बँकिंग सेवा पुरवतो. त्यातील काही योजनांचाही समावेश असतो. या योजनेद्वारे तुम्हाला योग्य परतावा मिळतो. जर तुम्हाला कमी पैशात काही ठराविक गुंतवणूक करायची असल्यात तुम्ही या पर्यायाचा विचार करू शकता. (Post Office Saving Schemes Recurring Deposit details)

संबंधित बातम्या : 

पोस्टाच्या ‘या’ योजनेत गुंतवा पैसे, 10 वर्षानंतर मिळतील 16 लाख रुपये

क्रेडिट कार्डचे बिल चुकतं न केल्यास काय होणार? घाबरु नका, तुमचे अधिकार जाणून घ्या

ना पार्ट टाईम जॉब, ना बिझनेस, नोकरीसोबत Second Income Source तयार करण्यासाठी भन्नाट टिप्स

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास
वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर, १४ तासांच्या चर्चेनंतर बील पास.
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.