फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही

| Updated on: Sep 07, 2021 | 7:35 AM

Investment | दीर्घकालीन गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्त फायदा कसा मिळेल, याचा विचार करत असतो. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील (Fixed Depopsit) व्याजदर कमी केला आहे.

फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा जास्त रिटर्न्स मिळवून देणारे पर्याय, जाणून घ्या सर्वकाही
फिक्स्ड डिपॉझिट
Follow us on

मुंबई: दीर्घकालीन गुंतवणूक करताना प्रत्येकजण जास्त फायदा कसा मिळेल, याचा विचार करत असतो. कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल मंदावल्यामुळे बँकांनी मुदत ठेव योजनांवरील (Fixed Depopsit) व्याजदर कमी केला आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदार सुरक्षित आणि चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या पर्यायांच्या शोधात आहेत.

स्मॉल फायनान्स बँक

देशातील प्रमुख सरकारी आणि खासगी बँकांनी बचत खाते आणि मुदत ठेव योजनांवरील व्याजदर घटवला असला तरी स्मॉल फायनान्स बँक आणि काही बिगरबँकिंग वित्तसंस्थांकडून फिक्स्ड डिपॉझिटवर आकर्षक व्याज दिले जात आहे. त्यामुळे या स्मॉल फायनान्स बँकांची पार्श्वभूमी व्यवस्थित तपासून त्यामध्ये पैसे गुंतवल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो.

फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवलेत, मग ही तारीख विसरु नका, अन्यथा…

पब्लिक प्रोव्हिडंट फंड (Public Provident Fund- PPF)

पब्लिक प्रोव्हिडंट फंड हा गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांपैकी एक मानला जातो. दीर्घकालीन गुंतवणुकीचा हा पर्याय तुम्हाला चांगला परतावा मिळवून देतो. पीपीएफ योजनेचा कालावधी 15 वर्षांचा असतो. हा कालावधी आणखी पाच वर्षांसाठी वाढवलाही जाऊ शकतो. सात वर्ष पूर्ण झाल्यानंतर तुम्ही पीपीएफमधील काही रक्कम काढूही शकता.

म्युच्युअल फंड

दीर्घकालीन गुंतवणुकीसाठीचा आणखी एक उत्तम पर्याय म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडाचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. यामधील पैसे भांडवली बाजारात गुंतवले जात असल्याने गुंतवणुकदारांना चांगला परतावा मिळतो. तज्ज्ञ व्यक्ती आणि कंपन्यांकडून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीचे व्यवस्थापन केले जाते. त्यामुळे तुम्हाला फारशी चिंता करण्याचे कारण नसते.

इक्विटी

पैसे कमावण्याचा झटपट मार्ग म्हणून भांडवली बाजाराकडे (Share Market) पाहिले जाते. शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणे जोखमीचे काम असले तरी योग्य धोरण आखून दीर्घकालीन गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगला परतावा मिळू शकतो. शेअर मार्केटमधील दीर्घकालीन गुंतवणुकीवर तुलनेत जोखीमही कमी असते. त्यामुळे ब्लु चीप किंवा मिड कॅप कंपन्यांच्या समभागांमध्ये दीर्घकालीन गुंतवणूक करणे हा एक चांगला पर्याय ठरतो.

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार

बँका आणि बिगरबँकिंग वित्तीय संस्थांप्रमाणे आता गुगलनेही मुदत ठेव योजना (Fixed Deposite Scheme) सुरु केली आहे. केवळ भारतातील ग्राहकांसाठी गुगलने ही योजना सुरु केली आहे. त्यानुसार ग्राहक Google Pay च्या माध्यमातून FD खरेदी करु शकतील. सेतू या फिनटेक कंपनीच्या साहाय्याने गुगलने ही योजना सुरु केली आहे.

या कंपनीच्या एपीआयच्या माध्यमातून गुगल ग्राहकांना मुदत ठेवीची सेवा देईल. मात्र, गुगल स्वत: ही स्कीम विकणार नाही. तर अन्य बँकांच्या एफडी ‘गुगल पे’च्या माध्यमातून थेट ग्राहकांना उपलब्ध करुन देईल. यामध्ये सुरुवातीला इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेची मुदत ठेव योजना ग्राहकांसाठी उपलब्ध असेल.

इक्विटॉस स्मॉल फायनान्स बँकेच्या एका वर्षाच्या मुदत ठेव योजनेवर 6.35 टक्के इतके व्याज मिळेल. या योजनेत पैसे गुंतवण्यासाठी तुम्हाला आधार क्रमांक देऊन केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक ओटीपी येईल. त्यासाठी सेतू कंपनीने एपीआयचे बीटा व्हर्जन तयार केले आहे. त्यामुळे आता लवकरच ही योजना ग्राहकांसाठी उपलब्ध होईल.

संंबंधित बातम्या:

आता गुगलही बँकांप्रमाणे फिक्स्ड डिपॉझिट योजना सुरु करणार; एका वर्षासाठी किती व्याज मिळणार?

सप्टेंबर महिन्यात ‘या’ 5 बँकांच्या FD मधल्या गुंतवणुकीवर दुप्पट फायदा, जाणून घ्या सर्वकाही

या तीन बँकांमध्ये फिक्स्ड डिपॉझिटवर मिळतेय सर्वाधिक व्याज