PPF Vs Sukanya Samriddhi Scheme | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता, कोणती योजना उत्तम, कुठे सर्वाधिक फायदा, जाणून घ्या सर्व माहिती

जर तुमची मुलगी लहान असेल तर तिच्या भविष्यासाठी कुठे गुंतवणूक केली पाहिजे, असा प्रश्न निर्माण होतो. (PPF VS sukanya samriddhi yojana Scheme Benefits all details)

PPF Vs Sukanya Samriddhi Scheme | मुलीच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंतची चिंता, कोणती योजना उत्तम, कुठे सर्वाधिक फायदा, जाणून घ्या सर्व माहिती
Girl-Child
Follow us
| Updated on: Jun 13, 2021 | 10:37 AM

Public Provident Fund मुंबई : सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) आणि सुकन्या समृद्धी योजना (Sukanya Samriddhi Yojana) या दोन्ही लहान बचत योजना आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही योजना EEE प्रकारात येतात. याचा अर्थ या गुंतवणूक केल्यास तुम्हाला नक्कीच फायदा मिळतो. तसेच या दोन्ही योजनेतील गुंतवणूक ही पूर्णपणे टॅक्स फ्री असते. तसेच मॅच्युरिटीवरील रक्कमही टॅक्स फ्री असते. (PPF VS sukanya samriddhi yojana Scheme Benefits all details)

सुकन्या समृद्धी योजना ही खास मुलींसाठी तयार केली गेली आहे. तर पीपीएफमध्ये कोणीही गुंतवणूक करु शकतो. पण अशा स्थितीत जर तुमची मुलगी लहान असेल तर तिच्या भविष्यासाठी कुठे गुंतवणूक केली पाहिजे, असा प्रश्न निर्माण होतो.

सद्यस्थितीत पीपीएफवर 7.1 टक्के व्याज मिळतो. यात तुम्ही एका आर्थिक वर्षात कमीत कमी 500 रुपये आणि जास्तीत जास्त 1.5 लाख रुपये जमा करु शकता. अल्पवयीन मुलीच्या नावे त्याचे पालक हे खाते उघडू शकतात. हे खाते 15 वर्षांत मॅच्युअर होते. यानंतर 5 वर्षापर्यंत ते वाढवता येऊ शकते.

15 वर्षांनंतर मिळतील 27 लाख 

म्हणजेच समजा तुमच्या मुलीचे वय आता 5 वर्ष आहे आणि जर तुम्ही तिच्या नावे पीपीएफ खाते उघडले. त्यात तुम्ही दरवर्षी 1 लाख रुपये जमा केले तर 15 वर्षानंतर ती रक्कम सध्याच्या व्याजदर (7.1 टक्के) नुसार 27.12 लाख होईल. म्हणजे तुम्ही 15 वर्षांत जमा केलेली रक्कम ही 15 लाख रुपये असेल. मात्र जेव्हा तुमची मुलगी 21 वर्षांची असेल, तेव्हा तिच्या खात्यात 27 लाख 12 हजार 139 इतकी रक्कम जमा होईल.

25 वर्षे पूर्ण झाल्यावर एकरकमी 44.38 लाख

पण समजा जेव्हा तुमची मुलगी 20 वर्षांची होईल आणि त्यावेळी तुम्हाला पैशांची गरज नसेल तर तुम्ही ही गुंतवणूक आणखी पाच वर्षांनी वाढवू शकता. त्यामुळे अशा परिस्थितीत 25 वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्हाला 44.38 लाख एकरकमी रक्कम मिळू शकते. मात्र यासाठी तुम्हाला आणखी 20 लाख रुपये जमा करावे लागतील.

व्याजदर 7.6 टक्के

सुकन्या समृद्धी योजनेत सध्या 7.6 टक्के व्याजदर मिळतो. यात तुम्हाला प्रत्येक आर्थिक वर्षात जास्तीत जास्त दीड लाख रुपये जमा करता येतात. हे खाते 10 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावावर उघडले जाऊ शकते. ही योजना मुलीच्या वयाच्या 21 व्या वर्षी मॅच्युअर होते.

या योजनेत तुम्हाला 15 वर्षांसाठी गुंतवणूक करावी लागते. तुम्ही हे खाते उघडल्यापासून पुढील 15 वर्षांसाठी तुम्हाला यात गुंतवणूक करावी लागते. खाते उघडण्याच्या तारखेपासून 21 वर्षानंतर ही योजना मॅच्युअर होते. मात्र वयाच्या 18 वर्षानंतर मुलीचे लग्न झाल्यावर या योजनेतील पैसे काढता येतात.

खाते उघडल्यानंतर 21 वर्षानंतर मॅच्युअर

समजा तुमच्या मुलीचे वय 5 वर्षे आहे आणि तुम्ही दरवर्षी तिच्या नावे 1 लाख जमा केले तर 15 वर्षानंतर तुमच्या खात्यात 15 लाख रुपये जमा होतील. म्हणजे जेव्हा ती 20 वर्षांची होईल तेव्हा ती तिच्या नावे 15 लाख रुपये जमा असतील. जर तुम्ही हे अकाऊंट 2021 मध्ये सुरु केल्यास ते 2042 पर्यंत म्हणजे 21 वर्षानंतर मॅच्युअर होईल. त्यावेळी तुमच्या मुलीचे वय 26 वर्षे असेल. त्यावेळी तुम्हाला 42.43 लाख रुपये मिळतील. (PPF VS sukanya samriddhi yojana Scheme Benefits all details)

संबंधित बातम्या : 

विमा खातं उघडून विसरलाय? LIC कडे तुमचे काही पैसे पडून तर नाही ना हे ‘असं’ तपासा

एकही रुपया न देता Toyota ची ढासू SUV घरी न्या, 5 महिन्यांनी पैसे भरा

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.