Petrol Diesel Price Today : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, भाव जाणून घ्या एका क्लिकवर

Petrol Diesel Price Today : राज्यातील ग्राहकांना आज पेट्रोल-डिझेलने दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. तुमच्या शहरातील इंधनाच्या किंमती जाणून घ्या..

Petrol Diesel Price Today : राज्यातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण, भाव जाणून घ्या एका क्लिकवर
जाणून घ्या आजचे भाव
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 8:30 AM

नवी दिल्ली : जागतिक बाजारात ओपेक प्लस देशांनी मोठी खेळी खेळत कच्चा तेलाचे भाव वाढवले आहेत. आता या खेळीत चीन मोठी भूमिका निभावणार आहे. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, चीन इंधनाची मागणी वाढवू शकतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय कच्चा तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता आहे. चीनची अर्थव्यवस्था कोविडच्या संकटानंतर पुन्हा उभारी घेत आहे. त्यामुळे इंधनाची मागणी वाढली आहे. आज क्रूड ऑईलमध्ये (Crude Oil) मोठी उलथापालथ झाली नाही. भारतीय तेल विपणन कंपन्यांनी सकाळीच भाव जाहीर केले. राज्यातील ग्राहकांना आज इंधनाने मोठा दिलासा दिला. भावात मोठी घसरण दिसून आली. आज तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचा भाव (Petrol-Diesel Price) काय आहे.

कच्चा तेलाचा भाव काय आज कच्चा तेलाच्या किंमतीत किंचित वाढ नोंदविण्यात आली. डब्ल्यूटीआई क्रूड ऑईल (WTI Crude Oil) 80.92 प्रति बॅरल तर ब्रेंट क्रूड ऑईलमध्ये (Brent Crude Oil) वाढ झाली. हा भाव 84.86 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला. पेट्रोलियम कंपन्या सकाळी 6 वाजताच पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात.

असा बसेल फटका

हे सुद्धा वाचा
  1. ओपेक आणि रशियाचा कच्चा तेलाच्या उत्पादनात कपातीचा निर्णय
  2. 1 दशलक्ष कच्चा तेलाचे उत्पादन घटविण्यात येईल
  3. सौदी अरब प्रति दिवस 5 लाख बॅरल कपात करणार
  4. इराक प्रति दिवस 211,000 बॅरल कच्चा तेलाचे उत्पादन घटविणार
  5. संयुक्त अरब अमिरात 144,000 बॅरल प्रति दिवस कपात करणार
  6. कुवेत 128,000 बॅरल तर अल्गेरिया 48 हजार बॅरलचे उत्पादन घटविणार
  7. ओमानने 40,000 हजार बॅरल प्रति दिवस कपातीचा निर्णय घेतला आहे.
  8. त्यामुळे ब्रेंट क्रूड ऑईलच्या भावात 6 टक्के वाढ झाली

राज्यातील प्रमुख शहरातील भाव (Source:goodreturns)

  1. मुंबईमध्ये पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर आहे
  2. अहमदनगर पेट्रोल 106.45 तर डिझेल 92.96 रुपये प्रति लिटर
  3. अकोल्यात पेट्रोल 106.24 रुपये आणि डिझेल 92.79 रुपये प्रति लिटर
  4. अमरावतीत पेट्रोल 107.19 तर डिझेल 93.70 रुपये प्रति लिटर
  5. औरंगाबाद 107.34 पेट्रोल आणि डिझेल 93.82 रुपये प्रति लिटर
  6. जळगावमध्ये पेट्रोल 106.33 आणि डिझेल 92.85 रुपये प्रति लिटर
  7. कोल्हापूरमध्ये पेट्रोल 106.05 आणि डिझेल 92.60 रुपये प्रति लिटर
  8. लातूरमध्ये पेट्रोल 107.60 तर डिझेल 94.08 रुपये प्रति लिटर
  9. नागपूरमध्ये पेट्रोल 106.04 तर डिझेल 92.59 रुपये प्रति लिटर
  10. नांदेडमध्ये पेट्रोल 108.33 तर डिझेल 94.79 रुपये प्रति लिटर
  11. नाशिकमध्ये पेट्रोल 106.53 रुपये आणि डिझेल 93.03 रुपये प्रति लिटर
  12. पुण्यात पेट्रोलचा भाव 105.96 आणि डिझेल 92.48 रुपये प्रति लिटर
  13. सोलापूरमध्ये पेट्रोलचा दर 106.92 रुपये तर डिझेल 93.43 रुपये प्रति लिटर

महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले...
महाराष्ट्राचा CM कोण? 2-2-1 फॉर्म्युला ठरला? शिरसाट स्पष्ट म्हणाले....
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'
'30-40 कोटी खर्च, गुंडांचा वापर दडपशाही तरी पराभव अन् खापर दादांवर..'.
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा
पिपाणी अन तुतारीच कन्फ्यूजन, शरद पवार गटाच्या 9 उमेदवारांचे बाजले बारा.
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी
आदित्य ठाकरेंचा शब्द अंतिम... उद्धव ठाकरेंकडून मोठी जबाबदारी.
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका
मनसे महायुतीत जाणार? पराभवानंतर नेत्यांची राज ठाकरेंच्या पुढे भूमिका.
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल
'माझा पराभव हा कट, दोन्ही पवारांनी बळी घेतला', भाजप आमदाराचा हल्लाबोल.
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी
महायुतीतून कोण मंत्री? दादा-शिंदे गट अन् भाजपच्या 'या' नेत्यांची वर्णी.
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब
फडणवीस नवे CM होणार? मुख्यमंत्रिपदासाठी नाव निश्चित? आजच शिक्कामोर्तब.
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?
दारूण पराभवानंतर पटोले काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा?.
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती
मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीसांना पाठिंबा, 'या' 5 अपक्ष आमदारांचीही पसंती.