Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत महागाईचा भडका, आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ

मुंबईत आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली आहे. CNG च्या किमतीमध्ये 7 रुपयांची वाढ होणार आहे. सुधारीत दरानुसार सीएनजी गॅसची किंमत 67 रुपये प्रति किलो होणार आहे. तर पीएनजीच्या किमतीमध्ये किलोमागे पाच रुपयांची वाढ होणार असून, पीएनजी 41रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहे.

मुंबईत महागाईचा भडका, आज मध्यरात्रीपासून CNG आणि PNG च्या किमतीत मोठी वाढ
सीएनजीच्या दरात वाढ
Follow us
| Updated on: Apr 05, 2022 | 9:31 PM

मुंबईत आज मध्यरात्रीपासून सीएनजी (CNG) आणि पीनएजी (PNG) च्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. महानगर गॅस लिमिटेडकडून ही दरवाढ करण्यात आली आहे. CNG च्या किमतीमध्ये 7 रुपयांची वाढ होणार आहे. सुधारीत दरानुसार सीएनजी गॅसची किंमत 67 रुपये प्रति किलो होणार आहे. तर पीएनजीच्या किमतीमध्ये किलोमागे पाच रुपयांची वाढ होणार असून, पीएनजी 41रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहे. राज्य सरकारने व्हॅट कमी केल्यामुले सीएनजीचे दर कमी झाले होते. मात्र आता महानगर गॅस लिमिटेडने (Mahanagar Gas Limited) दर वाढवल्याने याचा मोठा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे. राज्य सरकारकडून सीएनजी वरील व्हॅट साडे तेरा टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुले सीएनजी गॅसच्या दरात घसरण झाल्याचे पहायला मिळत होते. एक एप्रिलपासून सुधारीत दर लागू झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा कंपनीकडून दरात वाढ करण्यात आली आहे.

व्हॅटमध्ये कपात

अर्थमंत्री अजित पवार यांनी सीएनजी गॅसवरील व्हॅटमध्ये कपात करणार असल्याची घोषणा आर्थसंकल्पामध्ये केली होती. त्यानुसार अधिसूचना जारी करण्यात येऊन, एक एप्रिलपासून सुधारीत दर लागू करण्यात आले होते. व्हॅटमध्ये साडेतेरा टक्क्यांची कपात केल्याने राज्यात सीएनजी प्रति किलोमागे सहा रुपयांनी तर पीएनजी साडेतीन रुपयांनी स्वस्त झाला होता. मात्र याचा नागरिकांना फार काळ आनंद घेता आला नाही. अवघ्या चारच दिवसांमध्ये महानगर गॅस लिमिटेडकडून सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. याचा मोठा फटका हा नागरिकांना बसणार आहे.

आज मध्यरात्रीपासून दरवाढ

मुंबईला गॅस पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेडकडून आज सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या दरवाढीनुसार आज मध्यरात्रीपासून सीनजी 7 रुपयांनी तर पीएनजी 5 रुपयांनी महाग होणार आहे. भाव वाढीनंतर सीएनजीचे दर 67 रुपये प्रति किलोवर पोहोचणार आहेत, तर पीएनजीचे दर प्रति किलो 41रुपये इतके होणार आहेत. पेट्रोल, डिझेल यांच्या किमती सातत्याने वाढत असतानाच आता ग्राहकांना हा आणखी एक मोठा फटका बसणार आहे.

संबंधित बातम्या

स्विगी, झोमॅटो विरोधात चौकशीचा फेरा, जाणून घ्या डिस्काउंटचं नेमकं गणित

“सीसीआय”च्या रडारवर Zomato-Swiggy, शेअर्स 5 टक्क्यांनी गडगडले; गुंतवणुकदारांत अनिश्चितता

सर्व जगातच इंधनाचे दर वाढले, अमेरिकेत पेट्रोलच्या भावात 55 टक्क्यांची वाढ; इंधन दरवाढीवर सरकारचे स्पष्टीकरण

कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा
कुणाल कामराला अटक पूर्व जमीन मंजूर, मद्रास हाय कोर्टाचा दिलासा.
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
केवळ दशक नाही, तर लोकांचं आयुष्य बदललंय - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं
बावनकुळे - राऊत यांच्यात जुंपली; वार पालटवाराचं शाब्दिक युद्धं.
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आमचं सरकार टॅक्सच्या पै पैचा सन्मान करतं - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा
भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी, मोदींनी देशाच्या प्रगतीचा घेतला आढावा.
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली
न्यायालयाच्या आवारात कोरटकरवर शिव्यांची लाखोली.
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल
'तर हे कटाक्षाने पाळावं लागेल',ठाकरे गटाकडून 'तो' जुना व्हिडीओ व्हायरल.
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना
३१ तारखेच्या आत पीक कर्ज भरा; अजितदादांच्या शेतकऱ्यांना सूचना.
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया
'आकाच्या सांगण्यावरून..',आरोपींच्या कबुलीनंतर धसांची पहिली प्रतिक्रिया.