Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजारपणाला महागाईचा ताप, औषधं, गोळ्यांची किंमत वाढणार, 1 एप्रिलपासून रुग्णांच्या खिशाला झळ

Essential Medicine Inflation : रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांच्या डोक्याचा ताप वाढणार आहे. 1 एप्रिलपासून तुमच्या गोळ्या-औषधांचा खर्च वाढणार आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

आजारपणाला महागाईचा ताप, औषधं, गोळ्यांची किंमत वाढणार, 1 एप्रिलपासून रुग्णांच्या खिशाला झळ
औषधं महागलीImage Credit source: गुगल
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 11:50 AM

येत्या 4 दिवसानंतर देशातील कोट्यवधी रुग्णांना मोठा झटका बसणार आहे. जर तुम्ही नियमीतपणे औषधं, गोळ्या घेत असाल तर 1 एप्रिलपासून औषधांच्या किंमतीत मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाने (NPPA) अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशावर मोठा भार पडेल. त्यांना औषधांवर आता अधिक खर्च करावा लागेल.

केंद्र सरकारने औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण औषधांच्या किंमती, औषध नियंत्रित यादीत सहभागी केल्या आहेत. सरकारी आकड्यांनुसार, त्यामुळे देशभरातील रुग्णांचे दरवर्षी जवळपास 3,788 कोटी रुपयांची बचत होते. पण आता या किंमत नियंत्रण यादीतील औषधंच महागणार आहेत. ग्राहकांच्या खिशावर ताण येणार आहे.

किती वाढतील किंमती?

हे सुद्धा वाचा

या विषयीच्या अहवालानुसार, कॅन्सर, मधुमेह, हृ्दयरोग आणि अँटिबायोटिक्स सारख्या अत्यावश्यक औषधांच्या किंमतीत 1.7% पर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढीला राष्ट्रीय औषधी मूल्य निर्धारण प्राधिकरणाची (NPPA) मंजूरी आवश्यक असते. ही संस्था देशातील औषधांच्या किंमती नियंत्रित करण्याचे काम करते. पण कंपन्यांना या दरवाढीने दिलासा मिळाला आहे. त्यांना गेल्या काही वर्षांपासून वाढत्या महागाईने हैराण केले आहे. पण रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हा अतिरिक्त आर्थिक भार आहे. त्यामुळे त्यांच्या औषधांवरील खर्च वाढेल. त्यामुळे औषधांच्या किंमती भडकण्याची शक्यता आहे.

का वाढल्या किंमती?

NPPA ने दिलेल्या माहितीनुसार, महागाई आधारित मूल्य पुनरावलोकन (Inflation-based Price Revision) मुळे औषधांच्या किमतींमध्ये वाढीला मंजूरी देण्यात आली आहे. दरवर्षी सरकार आवश्यक औषधांच्या किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांचे पुनरावलोकन करते. यंदा घाऊक मूल्य निर्देशांकांमधील (WPI) वाढीमुळे औषध कंपन्यांना किंमती वाढवण्यास हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.

या औषधांच्या वाढतील किंमती

राष्ट्रीय आवश्यक औषध यादीत (NLEM) समाविष्ट औषधांच्या किंमतीत यावेळी वाढ होईल. अँटिबायोटिक्स, वेदनाशामक औषधे, हृदयविकार, मधुमेह, रक्तदाब आणि कर्करोग यासारख्या गंभीर आजारांवरील औषधांच्या किंमतीत वाढ होईल. त्याचा भार रुग्णांच्या खिशावर पडणार आहे. त्यांना आता पुढील आदेश येईपर्यंत वाढीव किंमतींनी औषध खरेदी करावे लागेल.

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.