Inflation | पुन्हा भाकरी महागणार..किंमती नियंत्रीत ठेवण्यात सरकारला अपयश..

Inflation | महागाईच्या मोर्चावर सरकर सपशेल अपयशी होत असताना दिसत आहे. किंमती नियंत्रणात येत नसल्याने महागाईचा पुन्हा भडका उडण्याची चिन्हं आहेत..

Inflation | पुन्हा भाकरी महागणार..किंमती नियंत्रीत ठेवण्यात सरकारला अपयश..
महंगाई डायनImage Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Sep 23, 2022 | 2:29 PM

नवी दिल्ली : देशात महागाईचा (Inflation) आगडोंब उसळला आहे. गेल्या पाच वर्षांत सर्वच वस्तूंच्या (Price) प्रचंड वाढल्या आहेत. पेट्रोल-डिझेलने तर रॉकेट भरारी घेतली आहे. तशीच जरबदस्त भाव वाढ डाळी, अन्नधान्य आणि दैनंदिन वस्तूंमध्ये झालेली आहे. आता पुन्हा काही वस्तूंच्या किंमती वाढण्याचे संकेत खूद्द केंद्र सरकारनेच (Central Government) दिले आहेत.

साध्या तांदळाच्या किंमती पुन्हा भडकू शकतात. खरिपाचे मातेरे झाले आहेत. काही राज्यात तुफान पाऊस झाला आहे. तर काही भागात पावसाने डोळे वटारले आहेत. त्याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. खरिपाचे उत्पादन घटले आहे.  गेल्या वर्षीपेक्षाही उत्पादनाचा आकडा कमी होणार आहे.

सरकारने गैर-बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत साठा झपाट्याने कमी होण्याची सरकारला भीती होती. पण तोपर्यंत गैर बासमती तांदळाच्या निर्यातीत यंदा 11 टक्के वाढ झाली आहे. त्याचा फटका देशातंर्गत बाजारपेठेला बसला आहे.  आता किरकोळ बाजारात तांदळाच्या किंमती भडकणार आहेत.

हे सुद्धा वाचा

19 सप्टेंबरपर्यंत तांदळाच्या किरकोळ किंमतीत आठवड्याभरात 0.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर महिन्याभरात 2.46 टक्के आणि वर्षभरात 8.67 टक्के वाढ झाल्याचा दावा केंद्र सरकारने केला आहे. पाच वर्षांत किंमतीत सरासरी 15.14 टक्क्यांची वाढ झाली आहे.

यंद खरीपाचे मातेरे झाल्याने केंद्र सरकारने तांदळाच्या उत्पादनात 6 टक्क्यांची घसरण होईल. उत्पादन घटून 104.99 दशलक्ष टन होईल असा अंदाज सरकारने बांधला होता. पण निर्यातीने बाजारात तांदळाचा बंपर स्टॉक कमी झाला आहे.

तर गेल्याच आठवड्यात साठेबाजांवर कडक कारवाईचा इशारा सरकारने दिला होता. याचा अर्थ तांदुळ, गहू याची मोठ्या प्रमाणात साठेबाजी करुन ठेवण्यात आली आहे. यामुळेही बाजारात तांदळाचा तुटवडा होऊन किंमती भडकण्याचा धोका आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.